Join us

हा आहे 'अग्गं बाई सासूबाई' मालिकेतील आसावरीचा रिअल लाईफ 'बबड्या', जाणून घ्या त्याच्याविषयी या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 13:57 IST

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये. 

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये सर्वोच्च मालिकांपैकी एक आहे, ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे निवेदिता सराफ यांनी साकारलेली आसावरी या भूमिकेचा. 

 

या मालिकेच्या निमित्ताने  कित्येक वर्षानंतर रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी त्या सज्ज झाल्या.मालिकेनंतर त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात. मालिकेत आपल्या बबड्यावर जीव ओवाळून टाकणा-या आसावरी म्हणजेच निवेदिता यांचा रिअल लाईफ बबड्या म्हणजे त्यांचा मुलगा अनिकेत सराफही प्रकाशझोतात आला आहे.

केवळ बॉलिवूडमध्ये नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतही अनेक स्टारकिडस आपल्या आई वडिलांप्रमाणेच याच क्षेत्रात करियर करत आहेत आणि यातील अनेकांना या क्षेत्रात चांगले यश देखील मिळाले आहे. पण अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये. 

 

अनिकेत सराफ एक शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात रस आहे. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्यालादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे.  तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर 'निक सराफ' या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. मुलाने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करावे, अशी माझी इच्छा होती. अनिकेतने माझी स्वप्नपुर्ती केली असल्याचे निवेदिता सराफ यांनी सांगितले होते.

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईनिवेदिता सराफ