अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. मालिकेच्या कथेतील नाविन्य, मालिकेची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. मालिका आता एका अतिशय रंजक वळणावर आली आहे.
अभिजित व आसावरीचे १९ जानेवारीला मोठ्या दिमाखात लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर अभिजितच्या घरी गोंधळ वगैरे पार पडतो. भलेही आसावरी लग्न करून अभिजितच्या घरी आली असली तरी तिचे सगळं लक्ष आजोबा, सोहम व शुभ्रा यांच्याकडे लागून राहिलेलं असतं. लग्न जरी पार पडलं असलं तरी सोहमला अजिबात पटलेलं नाही. त्यामुळे तो त्यांना कसे वेगळे करता येईल, याची योजना आखत असतो.