Join us

'अंगारो सा' गाण्याची ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनाही भुरळ, डान्स पाहून पुष्पा आणि श्रीवल्लीला विसरून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 10:10 IST

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनाही 'पुष्पा २'मधील गाण्याची भुरळ पडली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी 'अंगारों सा' गाण्यावर डान्स केला आहे. 

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २' सिनेमातील पुष्पा आणि श्रीवल्लीचं 'अंगारों सा' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. प्रदर्शित होताच हे गाणं आणि गाण्याच्या हुक स्टेप व्हायरल झाल्या. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. आता अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी 'अंगारों सा' गाण्यावर डान्स केला आहे. 

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. वयाच्या पन्नाशीतही ते कायम फिट आणि उत्साही दिसतात. अविनाश आणि ऐश्वर्या अनेक गाण्यांवर रील व्हिडिओ बनवताना दिसतात. त्यांच्या डान्सचेही लाखो चाहते आहेत. नुकतंच त्यांनी पुष्पाच्या अंगारों सा या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या-अविनाश नारकर पुष्पा आणि श्रीवल्लीच्या हुक स्टेप करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. ऐश्वर्या नारकर या सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. तर अविनाश नारकर सन मराठीवरील कन्यादान मालिकेत दिसले होते.  

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकरपुष्पा