Join us

नशेसी चढ गई...; साडी नेसून बॉलिवूड गाण्यावर थिरकल्या ऐश्वर्या नारकर, अश्विनी कासारनेही दिली साथ, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:57 IST

ऐश्वर्या यांच्या रीलला चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. आता ऐश्वर्या यांनी बॉलिवूड गाण्यावर रील बनवला आहे.

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. ९०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले. ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही त्या चाहत्यांना देत असतात. अनेकदा त्या ट्रेंडिंग गाण्यावर रीलही बनवताना दिसतात. 

ऐश्वर्या यांच्या रीलला चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. आता ऐश्वर्या यांनी बॉलिवूड गाण्यावर रील बनवला आहे. या रीलमध्ये अभिनेत्री अश्विनी कासार हिनेदेखील ऐश्वर्या यांना साथ दिली आहे. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन हा रील व्हिडिओ शेअर केला आहे. 'नशेसी चढ गयी' या गाण्यावर ऐश्वर्या आणि अश्विनी डान्स करताना दिसत आहेत. साडी नेसून त्यांनी या बॉलिवूड गाण्यावर ठुमके लगावले आहेत. त्यांचा हा व्हिडिओदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

दरम्यान, थिएटर गाजवल्यानंतर आणि अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केल्यानंतर ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली.'स्वामिनी' या मालिकेतील त्यांनी साकारलेली गोपिकाबाई पेशवे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली. तर अलिकडेच त्यांच्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेने निरोप घेतला. या मालिकेत त्या खलनायिकेच्या भूमिकेत होत्या. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरटिव्ही कलाकार