Join us  

नारकर साहेब रॉक्स...! Mr & Mrs नारकरांचा ‘कच्चा बादाम’वरचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल नादखुळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 2:27 PM

Avinash Narkar Aishwarya Narkar dance VIDEO : ‘कच्चा बादाम’ या गाण्यानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनाही ‘कच्चा बादाम’ या गाण्यानं भुरळ घातली आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.

‘कच्चा बादाम’ या गाण्यानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. या गाण्यावरचे असंख्य रील्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाही.  मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल अविनाश नारकर (Avinash Narkar ) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar )  यांनाही ‘कच्चा बादाम’ या गाण्यानं भुरळ घातली आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.‘कच्चा बादाम’ वर अविनाश व ऐश्वर्या यांनी धम्माल डान्स केला आहे.  सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यावरच्या प्रतिक्रियाही तितक्याच भन्नाट आहे. ऐश्वर्या साडीत जबरदस्त डान्स करतेय. नारकर साहेबांचं तर विचारूच नका. त्यांनी अगदी धम्माल केली आहे. शेवटी मी आणि अश्विनीने ऐश्वर्याला बदाम विकायला लावलेच, असं म्हणत अविनाश नारकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. नारकरसाहेब रॉक्स, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. साहेबांनी खरोखर डान्स एन्जॉय केला, अशी कमेंट अन्य एका चहत्याने केली आहे. एक नंबर,कडक अशा असंख्य कमेंट्स करत चाहत्यांनी अविनाश व ऐश्वर्या यांना दाद दिली आहे. 

मराठी सिने आणि टीव्ही विश्वातील सर्वात आवडत्या जोडप्यांमध्ये अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नावाचा उल्लेख नक्कीच केला जातो. या दोघांनी अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे. अलिकडेच या दोघांनी एकत्र काम केलेली ‘श्रीमंता घरची सून’ ही मालिका संपली. मालिकेत दोघांची मध्यवर्ती भूमिका होती.

‘कच्चा बादाम’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या गाण्याला लाखो व्हयुज मिळाले आहे. बंगाली भाषेतील या गाण्याचे वेगवेगळ्या भाषेत व्हर्जन्ही तयार झाले आहेत. काहींनी त्यावर रील्सही बनवले आहेत. शेंगा विकणाºया एका विक्रेत्यानं हे गाणं गायलं आहे.  पश्चिम बंगालमधील कुरालगुजरी गावांत राहणाºया त्या गायकाचे नाव भुवन बादायकर असे आहे.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकर