Join us

तुम्ही खरं नाव का नाही लावत? चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, 'दोन्ही ओरिजनल...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 14:04 IST

ऐश्वर्या नारकर यांचं खरं नाव काय माहितीये का?

गेल्या दोन दशकांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत आपलं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar). नावाप्रमाणेच अतिशय सुंदर असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. वयाच्या पन्नाशीतही त्यांनी आपल्या फिटनेसने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. तसंच त्यांच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यामध्ये एकाने त्यांना तुमचं खरं नाव का नाही वापरत असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी काय उत्तर दिलं बघुया.

आजकाल इन्स्टाग्रामवर 'आस्क मी' सेशनचा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये फॉलोअर्स प्रश्न विचारु शकतात आणि सेलिब्रिटी त्याची उत्तरं देतात. ऐश्वर्या नारकर यांनीही या सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी अनेकांनी त्यांच्या फिटनेसची, लांबसडक केसांची तारीफ केली. त्यांच्या सौंदर्याचं गुपितही विचारलं. दरम्यान एकाने त्यांना नावाबद्दल प्रश्न विचारला. 'पल्लवी की ऐश्वर्या तुमचं आवडतं नाव कोणतं? तुम्ही तुमचं ओरिजनल नाव का वापरत नाही?'  असा प्रश्न विचारला. यावर त्या म्हणाल्या, 'दोन्ही नावं ओरिजनलच आहेत.'

ऐश्वर्या नारकर यांनी दिलेलं हे उत्तर सध्या चर्चेत आहे. त्यांचं लग्नापूर्वीचं नाव पल्लवी असं होतं. मात्र त्यांना सगळेच ऐश्वर्या नावानेच ओळखतात. त्यांनी अभिनेते अविनाश नारकर यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगाही आहे. सध्या ऐश्वर्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. तर रवी जाधव दिग्दर्शित सुष्मिता सेनच्या 'ताली' वेबसिरीजमध्येही त्यांनी भूमिका साकारली आहे.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरमराठी अभिनेतासोशल मीडियाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार