अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायम त्यांच्या रील्स, व्हिडिओमुळे चर्चेत असतात. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत त्या विरोचकाची भूमिका साकारत आहेत. ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती अविनाश नारकर यांचे रील्स सोशल मीडियावर जितके व्हायरल होतात तितकं त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. अनेकदा त्यांना 'म्हातारचाळे' म्हणूनही ट्रोल केलं गेलं. नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी एका ट्रोलरचा मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत सडेतोड उत्तर दिलं आहे.
ऐश्वर्या नारकर यांना DM मध्ये एका युझरने बरेच मेसेज केलेत. त्यांच्या प्रत्येक रीलवर त्याने काही ना काही कमेंट केली आहे. ट्रोल केलं आहे. ऐश्वर्या नारकर यांनी त्याच्या नावासकट त्याला झापलं आहे. या कमेंट्समध्ये युझरने ' म्हाताऱ्या झाल्या तुम्ही आता', 'ट्रोलर्सला तुम्ही उत्तरं देत राहता म्हणजेच तुमच्यावर परिणाम होतो हे स्पष्ट झालं', 'तुमची त्वचा फारच dull दिसायला लागली आहे, हातही बारीक झालेत. जास्त टेन्शन घेऊन नका', '10 पोरांची अशक्त आई', 'काळी झाली तू, हाडंही दिसायला लागलेत. म्हातारी झाली तू आता' अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स त्या युझरने केल्या आहेत.
याचा स्क्रीनशॉट शेअर करत ऐश्वर्या यांनी लिहिले, 'प्रवास बघा आपला. डोक्यावर आपटत गेलात की काय...आपली लायकी काय...आपण बोलतो काय...'
दरम्यान, सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेत नेत्राने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. यापैकी तिच्या एका मुलामध्ये विरोचकाचा अंश असल्याचं दाखविण्यात येणार आहे. तर विरोचकाच्या भूमिकेत असलेली रुपाली मालिकेत नव्या रुपात दिसणार आहे. या मालिकेत आता ऐश्वर्या नारकर बंगाली भूमिका साकारताना दिसणार आहेत.