Join us

ऐश्वर्या नारकरांचं ब्युटी सिक्रेट; 20 वर्षांपासून योगासनांसोबत फॉलो करतायेत 'या' तीन गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:05 IST

Aishwarya narkar: अनेक वर्ष इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या ऐश्वर्या यांचा फिटनेस आणि सौंदर्य अबाधित आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर ( aishwarya narkar). दमदार अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर ऐश्वर्या यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक वर्ष इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या ऐश्वर्या यांचा फिटनेस आणि सौंदर्य अबाधित आहे. त्यामुळे त्यांच्या सौदर्याचं आणि खासकरुन फिटनेसचं नेमकं रहस्य काय असा प्रश्न कायम चाहत्यांना पडतो. म्हणूनच, ऐश्वर्या यांनी त्यांचं सिक्रेट शेअर केलं आहे.

गेल्या २० वर्षांपासून ऐश्वर्या नारकर न चुकता जिम, वेट ट्रेनिंग आणि योग करत आहेत. तसंच याच्या जोडीला त्या कायम सकस, पौष्टिक आहारावर भर देतात.

"माझा दिवस सकाळी ५:३० वाजता सुरु होतो आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून त्या नंतर रोज अंदाजे ३० - ४० मिनिटं योग करते ज्याच्याने मला खरं तर मन:शांती मिळते. माझ्या पुतणीकडून मी योग शिकले. ती एक योग प्रशिक्षक आहे. तसंच मी व्यायाम करण्यासोबतच पौष्टिक आहार घेते. गव्हाचे आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळते. माझे सगळे पदार्थ शुद्ध तुपामध्ये केले जातात. लहानपणापासून मी भात तर खातेच. सगळ्यांना माझं इतकंच सांगणं आहे की, लहानपणीच्या खाण्याच्या सवयी मोडू नका. आपल्या आयुष्यात समतोल आणि सातत्य ठेवले कि आपलं आरोग्य निरोगी राहतं. झोप, पौष्टिक आहार आणि व्यायाम हाच माझ्यासाठी निरोगी राहण्याचा खरा मंत्र आहे, असं ऐश्वर्या नारकर म्हणाल्या.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत रुपाली राज्याध्यक्ष ही भूमिका साकारत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच सोशल मीडियावरही त्यांचा दांडगा वावर आहे.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरटेलिव्हिजनसेलिब्रिटीयोगासने प्रकार व फायदे