Join us

'बिग बॉस'मध्ये होणार 'या' अभिनेत्रीच्या Ex बॉयफ्रेंडची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 3:01 PM

'बिग बॉस 17' शोमध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड स्पर्धक दाखल होणार असल्याची बातमी आहे.

'बिग बॉस सीझन 17' हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय झाला आहे. 'बिग बॉस 17' शोमध्ये टीव्ही सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया स्टार्सपर्यंत अनेक स्पर्धक सहभागी झाले आहे. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासूनच शो अगदी रंगतदार झाला आहे. आता आणखी एक वाईल्ड कार्ड स्पर्धक या शोमध्ये दाखल होणार असल्याची बातमी आहे. तो प्रसिद्ध अभिनेत्रीचा माजी प्रियकर असणार आहे. त्यामुळे आता हा शो अधिक रंजक वळणारवर येणार आहे.

ऐश्वर्या शर्मा या शोची तगडी स्पर्धक आहे. हळूहळू तिचा गेम प्लॅन सुधारत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ती पती नील भट्टसोबत भांडताना दिसली होती. दोघांच्या भांडणाने सर्वांच लक्ष वेधलं होतं. आता शोमध्ये ऐश्वर्या शर्माचा माजी प्रियकर राहुल पंड्या शोमध्ये प्रवेश करणार आहे. ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक यांच्यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळतोय. आता राहुल पंड्याच्या एन्ट्रीनंतर चाहत्यांना पुन्हा एक लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. 

काही दिवसांपूर्वी राहुलने ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले होते. राहुलने सांगितले होते की, तो अनेकदा ऐश्वर्याला ऑडिशनसाठी मुंबईत घेऊन येत असे. तो आणि ऐश्वर्या उज्जैनमधील एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. एका आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेदरम्यान त्यांची भेट झाली आणि नंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. त्यांचे नाते सुमारे 6 वर्षे टिकले. पण जेव्हा ऐश्वर्याच्या वडिलांना या नात्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांच्या दुरावा वाढला. 

 ऐश्वर्याने 2021 मध्ये नील भट्टसोबत लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. ऐश्वर्या आणि नील यांनी स्टार प्लसवरील 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच त्यांची लव्हस्टोरी फुलली.  ऐश्वर्या 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीबॉलिवूड