Join us

'इंडियन आयडॉल मराठी' या शोच्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार 'अजय अतुल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 19:59 IST

इंडियन आयडॉल मराठी या सिंंगिग रिएलिटी शोमधून मिळणार कलाकारांच्या कलागुणांना वाव

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी हिंदी शो इंडियन आयडॉलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यानंतर आता मराठीत हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे 'इंडियन आयडल - मराठी'! कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'इंडियन आयडल - मराठी' ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या इतक्या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षणही संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत.

पुण्यात नारायण पेठ येथे भित्तिचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली या वेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्री. अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर श्री.अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते.  

आपल्या संगीताचे  गारुड अजय-अतुल या जोडीने महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातले आहे. या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचे नाव 'इंडियन आयडॉल - मराठी' या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आले.

मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच आशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेले हे चित्रं पुणे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे भित्तिचित्र काढले आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉलसोनी मराठी