सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. अनु मलिक, नेहा कक्कड आणि विशाल दादलानी या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. यावर्षीच्या इंडियन आयडॉलची थीम ‘एक देश एक आवाज’ असून या आठवड्यात इंडियन आयडल या कार्यक्रमात शेवटच्या दहा स्पर्धकांची निवड झाली आहे. या आठवड्यात या मुलांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी अजय अतुल हजेरी लावणार आहेत.
अजय अतुलने केलेली ही गोष्ट वाचून तुम्हाला देखील वाटेल त्यांचा अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 06:30 IST
अजय अतुल यांनी नुकतीच इंडियन आयडल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी केलेली एक गोष्ट वाचून तुम्हाला त्यांचा नक्कीच अभिमान वाटेल.
अजय अतुलने केलेली ही गोष्ट वाचून तुम्हाला देखील वाटेल त्यांचा अभिमान
ठळक मुद्देजन्नबीच्या परफॉर्मन्सने अजय अतुल प्रभावित झाले असून त्यांनी त्यांच्या पुढील गाण्यासाठी तिला करारबद्ध केले. यामुळे जन्नबी खूपच भावनिक झाली आणि हे प्रत्यक्षात घडत आहे यावर तिचा विश्वासच बसला नाही.