Join us

अजिंक्य राऊतला सिनेइंडस्ट्रीत झाली ७ वर्षे पूर्ण, आभार मानत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:07 IST

Ajinkya Raut : 'विठू माऊली' मालिकेतून घराघरात पोहोचलेला विठ्ठल आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून इंद्रा म्हणून लाखो तरुणींची क्रश झालेल्या अजिंक्यने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे.

अभिनेता अजिंक्य राऊत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या मालिकेत काम केले आहे. तसेच तो रुपेरी पडद्यावरही झळकला आहे. त्याला कलाविश्वात येऊन ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अजिंक्य राऊतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अजिंक्य राऊतने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, सिनेइंडस्ट्रीत ८वे वर्ष साजरे करत आहे. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी हे सर्व सुरू झाले. ऑनस्क्रीन भगवान विठ्ठल साकारायला मिळाले. या वर्षी मी मनोरंजन उद्योगात ७ वर्षे पूर्ण केली. या कृपेसाठी भगवान विठ्ठलाचा आभारी आहे. प्रिय आदिशक्ती थिएटर, महेश कोठारे सर आणि कोठारे व्हिजनच्या टीमने माझ्यावर त्यांचा ऑनस्क्रीन विठोबा म्हणून विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. या अविश्वसनीय प्रोजेक्टसाठी स्टार प्रवाहचा आभारी आहे. विठुमाऊली प्रकल्पातील अविश्वसनीय कलाकारांचे आभार आणि प्रेम, कौतुक आणि समर्थन, प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांचाही आभारी आहे.

'विठू माऊली' मालिकेतून घराघरात पोहोचलेला विठ्ठल आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून इंद्रा म्हणून लाखो तरुणींची क्रश झालेल्या अजिंक्यने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. अजिंक्यने 'टकाटक २', 'सरी' असे दर्जेदार चित्रपट करून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.शेवटचा तो अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेत काम करताना दिसला.