"आंदोलनाच्या नावाखाली दूध वाया घालवणा-यांना लाज कशी वाटली नाही", आकांक्षा पुरीने केली तीव्र टीका, पोस्ट शेअर करत राग केला व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 03:37 PM2020-07-23T15:37:01+5:302020-07-23T15:43:51+5:30
आकांक्षा पुरीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सगळेच दाक्षिणात्य चित्रपट गाजले आहेत. ती मधुर भांडारकरच्या कॅलेंडर 'गर्ल्स' या चित्रपटात देखील झळकली होती.
लॉकडाऊन काळात दूध दरामध्ये मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतक-यांनी आक्रमक भूमिका घेतली. दूध संप पुकारत अनेक ठिकाणी दुधाचे टँकर फोडत दूध विक्री बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झालं.
My blood boils after seeing this ,,,dumping milk on street 😡 Are you guys for real 😡🙏 Shameless people !!what are you doing on the name of protest !! Millions of people are dying of hunger n thn I see this !! This visual gives me chills ,,stupid bunch of people https://t.co/B3kRKHeHvl
— Akanksha Puri (@akanksha800) July 21, 2020
याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वच स्थरांवरून या गोष्टीचा निषेध केला गेला. लॉकडाऊन काळात अशा प्रकारे दुध रस्त्यावर वाहत असल्याचे पाहून अनेकांचा संतापच झाला. संप करायचा आहे तर खुशाल करा पण अशा प्रकारे नुकसान करणे योग्य नाही असे प्रश्न उमटू लागले आहेत. यावर अभिनेत्री आकांक्षा पुरी चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली. तिने आपले परखड मत मांडत टीका करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे लोकांना पुरेसे दोन वेळचे अन्नही मिळत नाही, त्यात अशा प्रकारे टँकरमधून दूध रस्त्यावर ओतलं जात असल्याचे पाहून माझं रक्त खवळलं आहे. आंदोलनाच्या नावाखाली असं दूध वाया घालवणा-याना लाज कशी वाटली नाही. हे खरंच संतापजनक असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच तिने या संदर्भातला व्हिडीओही शेअर केला आहे.
आकांक्षा पुरीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सगळेच दाक्षिणात्य चित्रपट गाजले आहेत. ती मधुर भांडारकरच्या कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटात देखील झळकली होती. मोठ्या पडद्यावर नशीब आजमवल्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली सध्या टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे.