Join us

Bigg Boss Marathi 4चा विजेता ठरला अक्षय केळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 11:07 PM

Akshay Kelkar won Bigg Boss Marathi 4 : अखेर अक्षय केळकरने या शोमध्ये बाजी मारत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4)ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालं. एकापेक्षा एक तगडे १६ स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आले. शंभर दिवसांच्या या प्रवासात अखेरपर्यंत राहिले ते टॉप ५ स्पर्धक. यात राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकरचा समावेश होता. आज रंगलेल्या या रिएलिटी शोच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने घराबाहेर पडले. त्यानंतर अक्षय आणि अपूर्वामध्ये कोण बाजी मारणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते आणि अखेर अक्षय केळकर(Akshay Kelkar)ने या शोमध्ये बाजी मारत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला आहे तर अपूर्वा नेमळेकर(Apurva Nemlekar)ने पटकावले दुसरे स्थान. अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार इतकी धनराशी मिळाली आणि ट्रॉफी. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर. 

१०० दिवसांचा टप्पा पार करून अक्षय केळकर महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहचला. अक्षयने यासाठी प्रचंड मेहनत घेतली, खूप हुशारीने तो खेळला. त्याने कधी कुणाची मनं दुखावली नाहीत. तो कायम सगळ्यांशी जुळवून घेत राहीला. अगदी ज्या सदस्यांचे आणि त्याचे पटले नाही त्यांच्याशीही त्याने जुळवून घेतले. मात्र जे पटले नाही त्याला विरोधही केला. त्यामुळे अक्षयचा स्वभाव आणि खेळ पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे अक्षय बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा विजेता ठरला आहे. त्यामुळे त्याचे चाहते खूप खूश आहेत. सोशल मीडियावर ते आनंद व्यक्त करत अक्षयवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच अक्षयने देखील प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

अक्षय केळकरने सिनेइंडस्ट्रीत २०१३ साली छोट्या पडद्यावरुन एन्ट्री केली आहे. बे दुणे दहा ही त्याची पहिली मालिका. यात त्याने कबीरची भूमिका केली होती. त्यानंतर कमला या मालिकेत झळकला. मालिकेशिवाय त्याने २०१४ साली प्रेमासाठी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. याशिवाय तो कान्हा या चित्रपटात झळकला. तसेच कॉलेज कॅफे, माधुरी या चित्रपटातही त्याने काम केले. भाकरवडी या हिंदी मालिकेतही त्याने काम केले आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठी