Join us

काय सांगता?? अक्षय कुमारने श्रेया बुगडेला गिफ्ट केला स्मार्टफोन; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 11:46 IST

Akshay kumar: श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अक्षय कुमार तिला स्मार्ट फोन देताना दिसत आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी बच्चन पांडे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अलिकडेच अक्षयने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी त्याने कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे हिला चक्क एक स्मार्टफोन गिफ्ट केला. परंतु, अक्षयने केवळ श्रेयालाच हा फोन का दिला असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अक्षय कुमार तिला स्मार्ट फोन देताना दिसत आहे. तसंच त्याने सगळ्या कलाकारांपैकी केवळ श्रेयालाच हा फोन का दिला यामागचं कारणंही सांगताना दिसत आहे.

‘श्रेया मागच्या ८ वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ हा शो करत आहे आणि अलिकडे ती ‘किचन कल्लाकार’साठी सुत्रसंचालन करतानाही दिसली. पण तिच्या सोशल मीडियावर मात्र हवा येऊ द्यापेक्षा किचन कल्लाकारच्या सेटवरचे सर्वात जास्त फोटो आहेत. त्यामुळेच तिने या सेटवरुनही काही फोटो शेअर करावे यासाठी मी तिला हा स्मार्टफोन गिफ्ट करतोय, असं अक्षय म्हणाला.

दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरुन श्रेया फार कमी फोटो पोस्ट करते या अक्षयच्या बोलण्याला अन्य कलाकारांनीही दुजोरा दिला. या मंचावर अक्षयसह अभिनेत्री क्रिती सेनॉनदेखील उपस्थित होती.

टॅग्स :अक्षय कुमारश्रेया बुगडेटेलिव्हिजनसिनेमा