Join us

अक्षय म्हात्रे असा साजरा करतो 'गुढीपाडवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 9:41 AM

झी टीव्हीवरील पिया अलबेलामध्ये नरेनची भूमिका करणारा अक्षय म्हात्रे म्हणाला,“गुढीपाडवा हा सर्व महाराष्ट्रीय लोकांसाठी अतिशय शुभदिवस असून ह्या दिवशी ...

झी टीव्हीवरील पिया अलबेलामध्ये नरेनची भूमिका करणारा अक्षय म्हात्रे म्हणाला,“गुढीपाडवा हा सर्व महाराष्ट्रीय लोकांसाठी अतिशय शुभदिवस असून ह्या दिवशी आमच्या नववर्षाची सुरूवात होते.आम्ही हा दिवस आमचे घर पारंपारिक रांगोळीने सजवून आणि खास गुढी उभारून साजरा करतो.मी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यात भरपूर सकारात्मकता यावी अशी आशा करतो.ह्यावर्षी काही चविष्ट गोड पदार्थ चाखण्यासाठी आणि माझ्या मित्र व परिवारासोबत हा दिवस साजरा करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”‘पिया अलबेला’ मालिकेचे कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवत असून कथानकातील अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढत चालली आहे.या मालिकेने अलीकडेच प्रसारणाचा एक वर्षाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला असून मालिकेत पूजा या नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीन दास हिने मालिकेच्या चित्रीकरणाच्या आठवणी जाग्या केल्या.शीन दासचे मालिकेतील पारुल चौधरी (नीलिमा व्यास) या आपल्या सहकलाकाराशी आता सलोख्याचे संबंध निर्माण झाले असले, तरी सुरुवातीला त्यांच्यात इतके जवळचे नाते नव्हते. यासंदर्भात शीन दास सांगते, “पारुल आणि मी एकाच खोलीत कशी राहू, असा प्रश्न मला सुरुवातीला पडला होता. पण जसजशी मला तिची ओळख होत गेली, तसतशी ती किती चांगली व्यक्ती आहे, हे माझ्या लक्षात येऊ लागले. आता आमच्यात घट्ट नाते निर्माण झाले असून ती चित्रीकरणाच्यावेळी नसली तर मी तिला खूप मिस करते.”मालिकेतील तिचा नायक असलेल्या अक्षय म्हात्रेबरोबर तिची मैत्री कशी वाढत गेली,तेही शीनने सांगितले. ती सांगते, “अक्षयची ओळख होण्यास मला जरा वेळ लागला. कारण सुरुवातीला तो चित्रीकरणात इतका व्यग्र असायचा की, कोणाशी तितकासा बोलायचा नाही.तो सेटवर असला, की अगदी व्यावसायिक अभिनेत्याप्रमाणे वागायचा.पण मधल्या मोकळ्या वेळेत आणि सेटबाहेर तो एक मस्त धमाल करणारा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर वेळ घालविताना खूपच मजा येते. आपल्या कामाबद्दल तो खूपच गंभीर आणि प्रामाणिक असून हे गुण मी त्याच्याकडून शिकले आहे. या मालिकेमुळे अंकित (राहुल व्यास), पारुल चौधरी (नीलिमा व्यास) आणि अक्षय म्हात्रे (नरेन) यांसारखे खूप चांगले फ्रेंड्स मला मिळाले आहेत.”