पिया अलबेला या मालिकेतील अक्षय म्हात्रेला करावे लागले रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 11:59 AM
पिया अलबेला या मालिकेत अक्षय म्हात्रे नरेन ही भूमिका साकारत आहे. नरेन या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...
पिया अलबेला या मालिकेत अक्षय म्हात्रे नरेन ही भूमिका साकारत आहे. नरेन या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. अक्षयने याआधी काही मराठी मालिकांमध्ये काम केले होते. हिंदी मालिकेत काम करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. पिया अलबेला या मालिकेचे चित्रीकरण महिन्यातून अनेक दिवस केले जाते. तसेच अक्षयला दिवसातील बारा तासांहून अधिक वेळ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी द्यावा लागतो. पण अक्षयला त्याचे काम खूप आवडत असल्याने तो हे सगळे एन्जॉय करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तर अक्षयची तब्येत खूपच खराब असल्याने चित्रीकरण करणे त्याच्यासाठी अशक्य झाले आहे. त्याला गेल्या काही दिवसांपासून खूपच ताप येत आहे. त्याचा ताप उतरतच नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. डॉक्टर सध्या त्याच्यावर उपचार करत असून त्याला काही दिवस तरी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अक्षय या मालिकेत मुख्य भूमिकेत असल्याने त्याच्याशिवाय चित्रीकरण करणे हे मालिकेच्या टीमला अशक्य होत आहेत .त्यामुळे तो बरा होत नाही तोपर्यंत मालिकेचे चित्रीकरणच करायचे नाही असे राजश्री प्रोडक्शनने ठरवले आहे. तो पूर्ण बरा झाल्याशिवाय चित्रीकरण करायचे नाही हा निर्णय संपूर्ण टीमने मिळून घेतला आहे. अक्षयदेखील लवकरात लवकर पुन्हा सेटवर येण्यासाठी सध्या स्वतःची चांगलीच काळजी घेत आहे. याविषयी तो सांगतो, मला सुरुवातीला खूप सर्दी झाली होती. तसेच सतत ताप येत होता. पण सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण ताप उतरतच नसल्याने काही चाचण्या केल्या, त्यावेळी मला व्हायरल फिव्हर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही दिवस तरी विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. मी माझी योग्य काळजी घेत असून माझी औषधे वेळच्या वेळी घेत आहे. मी लवकरात लवकर चित्रीकरण करायला सुरुवात करेन याची मला खात्री आहे. Also Read : पिया अलबेलाच्या सेटवर अक्षय म्हात्रेने असे काय केले की ज्यामुळे शीन दासला तिचे रडू आवरले नाही