'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्ये यास्मीनला जीवनाला कलाटणी देणारा निर्णय घ्यावा लागणार आहे. मालिका बहुप्रतिक्षित क्षणांच्या दिशेने सरकत आहे. या जादुई काल्पनिक मालिकेने लक्षवेधक पटकथेसह प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ही मालिका आगामी एपिसोड्समध्ये देखील प्रेक्षकांना अचंबित करेल. बगदाद साम्राज्यामध्ये अलाद्दिनच्या भूताचा वावर आहे आणि कथेने एक रोमांचक वळण घेतलेले आहे. आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना यास्मीन आणि तिचा प्रेमी अलाद्दिन आमनेसामने येताना पाहायला मिळणार आहे.
यास्मीन (अवनीत कौर) अलाद्दिनचे भूत आणि अली यांच्यामध्ये असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण ती कोड्यात सापडून जाते, जेव्हा अलाद्दिनचे भूत बगदादच्या संपूर्ण बाजारपेठेसमोर येते आणि त्यावेळी अली (सिद्धार्थ निगम) तिच्या बाजूलाच उभा असतो. धक्कादायक घटनांमध्ये अलाद्दिन पुढील ५ दिवसांमध्ये त्याची निरागसता सिद्ध करण्याचे आणि यास्मीनचे वडिल बादशाह सलामतच्या ख-या खुन्याला उघडकीस आणण्याचे खुले आव्हान घेतो.अलाद्दिनचे भूत त्याच्या घोषणेनंतर यास्मीनसमोर येते आणि पहिल्यांदाच यास्मीन त्याला तिच्या वडिलांची हत्या करण्यात आलेल्या रात्री नक्की काय घडले होते याबाबत सांगण्याची संधी देते.
यास्मीनची भूमिका साकारणारी अवनीत कौर म्हणाली, ''यास्मीन दुविधेत सापडली आहे आणि तिला कोणावर विश्वास ठेवावा हे समजत नाही. आगामी एपिसोड्समध्ये अलाद्दिन तिला काय सांगतो याचा उलगडा होईल. पटकथेने रोमांचक वळण घेतले आहे आणि मी त्याचा खूप आनंद घेत आहे. आम्ही कथेमध्ये सामावून गेलो आहोत आणि रोज निर्माण होणा-या अपेक्षा जाणून घेऊ शकतो. प्रेक्षक आगामी एपिसोड्स पाहण्याचा भरपूर आनंद घेतील. हे एपिसोड्स त्यांना प्रेमीयुगुल अलाद्दिन आणि यास्मीनच्या काही गोड क्षणांकडे घेऊन जातील.''
अलाद्दिन आणि अलीची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्हणाला, ''अलाद्दिन जफरच्या दुष्ट कृत्यांचा उलगडा करत त्याचा सूड पूर्ण करण्याच्या जवळ आला आहे. तो त्याची जीवनातील प्रेमिका यास्मीनच्या समोर आला आहे. त्याच्यासाठी हत्येच्या रात्री घडलेल्या घटनांबाबत यास्मीनला सांगण्याची ही एक संधी आहे. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी मालिकेमधील माझा सर्वात आवडता ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट अत्यंत रंजक अॅक्शनने भरलेला आहे.