सोनी सबवरील नवीन मालिका 'अलिबाबा – दास्तान-ए-काबुल' सर्वोत्तम दर्जा, उत्साहवर्धक कथानक आणि मोहक नायकासह भारतीय टेलिव्हिजनवरील कौटुंबिक मनोरंजनपूर्ण मालिका आहे. अप्रतिम कथानकासोबत या मालिकेतील भव्य सेट आणि डोळ्यांची पारणं फेडेल असे लोकेशन्स पाहायला मिळतील जे प्रेक्षकांनी यापूर्वी भारतीय टेलिव्हिजनवर पाहिलेले नाही. या मालिकेतील काही दृश्य हि लडाख सारख्या सुंदर ठिकाणी चित्रित करण्यात आली आहेत.
ही मालिका करिष्माई तरूण अलिबाबाची कथा सादर करते, जो आशावादी असण्यासोबत अत्यंत मोहक आहे. तो पाच प्रेमळ अनाथांचा पालक आहे. आपल्या स्वत:च्या क्षमतांबाबत माहित नसलेला आणि नियतीने अपमानित केलेला अलिबाबा अद्भुत शोधावर जाईल, जो त्याच्या जीवनाला कायमस्वरूपी कलाटणी देईल. तो मरियमला भेटेल तेव्हा स्थिती अधिक रोमांचक होऊन जाईल. मरियम त्याला त्याचे खरे नशीब जाणून घेण्याच्या त्याच्या शोधामध्ये मदत करेल.
अलिबाबाची भूमिका साकारणारा शेहजान एम खान म्हणाला: ''मला या मालिकेचा भाग होण्याचा खूप आनंद होत आहे. 'अलिबाबा – दास्तान-ए-काबुल' निश्चितच भव्य मालिका आहे. रोचक कथानकाव्यतिरिक्त मालिका उल्लेखनीय व्हिज्युअल इफेक्ट्स व नयनरम्य ठिकाणांसह मनोरंजनाचा अतिरिक्त डोस देते.मी आशा करतो की, या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व पाठिंबा मिळेल.''