Join us

अस्सल पाहुणे इसराल नमुने कार्यक्रमामध्ये अलका कुबल आणि किशोरी शहाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 18:17 IST

अस्सल पाहुणे इसराल नमुने कार्यक्रमामध्ये अलका कुबल आणि किशोरी शहाणे त्यांच्या कारकिर्दीतील प्रेक्षकांना माहिती नसलेले अनेक किस्से सांगणार असून अमेय आणि निपुण यांची धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये खास व्यक्ती हजेरी लावतात. प्रेक्षकांसोबत ते त्यांचे न ऐकलेले अनुभव, किस्से सांगतात. अशोक चव्हाण, महेश मांजरेकर, बिग बॉस मराठीमधील महिला स्पर्धक, नाना पाटेकर, नितीन गडकरी आणि बऱ्याच सुप्रसिद्ध व्यक्ती या कार्यक्रमामध्ये येऊन गेल्या आहेत. या आठवड्यामध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अलका कुबल आणि किशोरी शहाणे तसेच अमेय वाघ आणि निपुण या कार्यक्रमात येणार आहेत. कार्यक्रमामध्ये अलका कुबल आणि किशोरी शहाणे त्यांच्या कारकिर्दीतील प्रेक्षकांना माहिती नसलेले अनेक किस्से सांगणार असून अमेय आणि निपुण यांची धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  

अस्सल पाहुणे इसराल नमुने या कार्यक्रमामध्ये या आठवड्यात प्रेक्षकांना बरीच धम्माल मस्ती बघायला मिळणार असून कधीही न ऐकलेले किस्से ऐकायला मिळणार आहेत. मकरंद अनासपुरे यांनी अलका कुबल यांना त्यांचा अभिनेत्री ते निर्माती हा प्रवास कसा सुरु झाला असे विचारले असता त्यांना या विषयी भरभरून गप्पा मारल्या. अलका कुबल यांनी सांगितले, सुवासिनीची सत्वपरीक्षा हा पहिला चित्रपट निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आणला. पण हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते.

सुवासिनीची सत्वपरीक्षा या चित्रपटाच्या निर्मितीच्या दरम्यान बरीच विघ्नं त्यांच्यासमोर आली... त्यांच्यावर मात करून त्यांनी कसा चित्रपट रिलीज केला याचा खुलासा त्या कार्यक्रमामध्ये त्या करणार आहेत. तसेच आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अलका कुबल आणि किशोरी शहाणे या दोन्ही अभिनेत्रीनी आपल्या नवऱ्याला लग्नासाठी कसे विचारले? याची गोष्ट देखील यावेळेस प्रेक्षकांना सांगणार आहेत.

अस्सल पाहुणे इसराल नमुने या कार्यक्रमामध्ये अमेय वाघ आणि निपुण यांनी बरीच धम्माल मस्ती केली आहे आणि किस्से सांगितले आहेत. अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाच्या गुरुवार आणि शुक्रवारच्या भागामध्ये रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना ही धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. हा भाग प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

टॅग्स :अलका कुबलकिशोरी शहाणे