‘आई माझी काळूबाई’ मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने अचानक ही मालिका सोडली त्यानंतर याबाबतचे अनेक वाद समोर आले. प्राजक्ताच्या मालिकेतील एक्झिटविषयी सांगत असताना या मालिकेच्या निर्मात्या आणि काळुबाईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ताविषयी राग व्यक्त केला आहे. प्राजक्ताचे सेटवर वागणे चांगले नव्हते. प्राजक्ताचे सेटवर गैरवर्तनाला अलका कुबला कंटाळल्या होत्या.याचविषयी सांगत असताना त्यांनी प्राजक्ता पूर्वी काम करत असलेल्या मालिकेचा उल्लेख केला.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्राजक्ताने काम केले आहे. तिथेही शूटिंग दरम्यान प्राजक्ताचे वागणे बरोबर नसल्याचे सांगत असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, मात्र आपली चूक कळताच त्यांनी एक वेगळा व्हिडीओ करत जाहीर माफी मागितली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत नितांत आदर असल्याचं त्यांनी म्हटलंय.अनावधानानं आपल्याकडून त्यांचा एकेरी उल्लेख झाल्यास त्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे.
‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली!
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनावेळी शेवटच्या क्षणापर्यंत अलका कुबल त्यांच्यासोबत होत्या. केवळ सोबतच नाही तर अलका कुबल यांनीच आशालता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत. अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये यावेळी उपस्थित होते. आपले शेवटचे सगळे काही अलका आणि त्यांचे पती समीर यांनीच करावे, अशी इच्छा आशालता यांनी मृत्यूपूर्वी बोलून दाखवली होती, त्यांची ही अखेरची इच्छा अलका यांनी पूर्ण केली.
अलका कुबल यांनाही वाहण्यात आली श्रद्धांजली, शेवटी व्हिडीओ शेअर करत सांगावे लागले......
आशालता यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर येताच अलका कुबल यांनाही कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरल्या होत्या. आशालता यांच्यासह चार दिवस अलका कुबल होत्या. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची चर्चा होती. सोशल मीडियावर अलका कुबल यांचीही मृत्युची अफवा पसरली. काहींनी तर बातमीची शहानिशा न करताच त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली.