Join us

यशाचे सर्व श्रेय प्रेक्षकांनाच! - रेमो डिसूझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 5:08 PM

रेमो डिसूझा यांनी दोन ते तीन वर्षांतच बॉलिवूडसह टीव्ही इंडस्ट्रीतही नाव कमावले. आता ते स्टार प्लस वाहिनीवरील ‘डान्स प्लस’ सीझन ४च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 तेहसीन खान

 अ‍ॅक्टर, डान्सर, कोरिओग्राफर, निर्माता, दिग्दर्शक अशा विविधांगी जबाबदाऱ्या लीलया सांभाळणाऱ्या रेमो डिसूझा यांनी दोन ते तीन वर्षांतच बॉलिवूडसह टीव्ही इंडस्ट्रीतही नाव कमावले. आता ते स्टार प्लस वाहिनीवरील ‘डान्स प्लस’ सीझन ४च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि शोविषयीची अधिक माहिती याबाबतीत चर्चा घडून आली. 

* ‘सपने सिर्फ अपने नहीं होते’ अशी ‘डान्स प्लस ४’ या शोची टॅगलाईन आहे. तुमचा या शोच्या बाबतीत कसा योगायोग आहे? - होय, मी नक्कीच या शोच्या बाबतीत योगायोगाला सामोरा गेलो आहे. माझ्या आयुष्यात मला आईचा खूप मोठा पाठिंबा होता. मला प्रत्येक कामात अधिकच फायदा झाला आहे. माझ्या आयुष्यात मला अनेक लोकांनी मला पाठिंबा दिला आहे. माझे मित्र, माझी पत्नी, बहिणी यांच्यासह सगळेच माझ्या यशाचे साथीदार आहेत.

* ‘डान्स प्लस’च्या पहिल्या सीझनपासून तुम्ही या शोसोबत जोडलेले आहात. हा शो इतर रिअ‍ॅलिटी शोपेक्षा किती वेगळा आहे?- प्रेक्षकांनी ‘डान्स प्लस’च्या तिसऱ्या सीझनला चांगलाच पाठिंबा दिला होता आणि आता चौथे सीझन येणार असून हे किती वेगळे आहे? हे कळेलच. आमचा एकच उद्देश असतो, डान्स प्लसच्या स्टेजवरून आम्ही उत्कृष्ट टॅलेंट दाखवू इच्छितो. या शोसोबत जेवढेही लोक जोडले गेलेले आहेत, ते सगळे हा शो सुपरहिट करण्यासाठी झटतात. 

* शक्ती, धर्मेश आणि पुनित हे सर्वजण रिअ‍ॅलिटी शोजमधून निवडले गेले आहेत. रिअ‍ॅलिटी शोजमध्ये काम करताना कोणत्या तीन बाबींकडे लक्ष द्यावे लागते?- दुर्लक्ष तर बऱ्याच गोष्टींकडे करावे लागते. कोणतंही काम करताना लक्ष देऊनच केले पाहिजे. आत्मविश्वास, सहनशीलता असलीच पाहिजे. त्याशिवाय ताण, जास्त सराव आणि कमी सराव या गोष्टी करायला नकोत. 

* ‘डान्स प्लस’च्या ४थ्या सीझनमध्ये आंतरराष्ट्रीय डान्सर्स देखील येत आहेत. त्यांच्याविषयी काय सांगाल?- गेल्या सीझनपासून आम्ही आंतरराष्ट्रीय डान्सर्सची एन्ट्री स्विकारत आहोत. आंतरराष्ट्रीय डान्सर्स जसे की, जाजा आणि बी-डॅश, कारेन आणि रिकार्डाे, पॉपिन जॉन आणि द रॉयल फॅमिली हे देखील असतील. त्यामुळे खूप मजा येणार आहे. 

* प्रेक्षकांना या माध्यमातून काय सांगाल?- केवळ एवढेच सांगेन की, आत्तापर्यंतच्या सीझनप्रमाणेच या सीझनलाही हिट बनवले पाहिजे. प्रेक्षकांना माहितीये की, त्यांना डान्स प्लस बघण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाहीये. त्यांच्यामुळेच मागचा सीझनही हिट झाला आहे. 

टॅग्स :रेमो डिसुझास्टार प्लस