सोनी सबवरील 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेने त्यांना अगदी खिळवून ठेवले आहे. यापुढेही काही रंजक घटना या मालिकेत घडणार आहेत. बगदादला नष्ट करू पाहणाऱ्या जीनीला शोधण्याचा प्रयत्न अम्मी करत आहे. तर, अल्लादिन अंगठीतल्या जीनीला नष्ट करण्याचे आणि जीनूचे गुपित उघड होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे.
जीनीला पकडण्यासाठी बुलबुल चाचाने पाठवलेल्या साधनांसह बगदादमधील प्रत्येक जण सज्ज झाला आहे. हे सगळं घडत असताना जीनू मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पूर्णपणे अल्लादिनवर अवलंबून आहे. राजवाड्यात आपण मेहेरसोबत आहोत हे कळल्यानंतर त्याला फसवल्याची भावना येते. यात भर म्हणजे, बगदादमधील प्रत्येक जण बासरी वाजवायला सुरुवात करतो. जीनीची ताकद कमी करण्यासाठी बासरीच्या आवाजाचा फायदा होणार असतो. मात्र, याचा परिणाम जीनूवरही होतो आणि तो काहीसा अस्वस्थ होतो. या त्रासामुळे त्या खोलीत असलेल्या सगळ्या बासऱ्या नष्ट करण्याचे जीनू ठरवतो. मात्र, त्याचवेळी अम्मी तिथे येते आणि जीनूला त्याच्या मूळ रुपात पाहून तिला धक्का बसतो. या धक्कादायक गुपितामुळे अम्मी नेमकी कशी वागेल?अम्मीची भूमिका करणाऱ्या स्मिता बंसल म्हणाल्या, बगदादच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी वाईट जीनीला शोधण्यासाठी अम्मीने अगदी मनापासून, सर्वस्व अर्पण करून प्रयत्न केलेत. मात्र, इतके प्रयत्न केल्यानंतर तिने दत्तक घेतलेला मुलगा जीनू हा सुद्धा एक जीनी आहे, हे धक्कादायक सत्य तिच्यासमोर येतं. या प्रसंगानंतर तिचे जीनूशी असलेले संबंध कसे बदलतात, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असेल.जीनूची भूमिका साकारणारे राशुल टंडन म्हणाले, आपल्याला वाचवण्यासाठी अल्लादिन सोबत नाही तर त्याला मेहेरसोबत थांबावं लागलं, हे कळल्यानंतर जीनू चिडतो. शिवाय, स्वत:ला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करूनही अम्मीसमोर जीनूचे गुपित उघड होते. हे सगळे घडत असताना प्रेक्षकांना बरेच काही उत्सुकतापूर्ण पहायला मिळेल आणि त्यांना फार मजा येईल, याची मला खात्री आहे.