Join us

अमेरिका डायरी! विशाखा सुभेदारने शेअर केला पतीसोबतचा रोमॅण्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 18:45 IST

vishakha subhedar: विशाखाने तिच्या नवऱ्यासोबतचा एक छानसा रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर सध्या चाहत्यांनी कमेंट्चा पाऊस पाडला आहे.

 छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार(vishakha subhedar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी विशाखा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. अलिकडेच तिने तिच्या नवऱ्यासोबतचा एक छानसा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विशाखा कायम सोशल मीडियाचा आधार घेत असते. त्यामुळे प्रोफेशनल लाइफसह तिच्या पर्सनल आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीही ती चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने तिच्या नवऱ्यासोबतचा एक छानसा रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर सध्या चाहत्यांनी कमेंट्चा पाऊस पाडला आहे.

'ढोलकीच्या तालावर' विशाखा सुभेदारने केला अफलातून डान्स; एनर्जी लेव्हल पाहून चाहते झाले थक्क

अलिकडेच विशाखाने 'कुर्रर्रर्रर्र' या नाटकाच्या निमित्ताने अमेरिका दौरा केला. या दौऱ्यात तिच्यासोबत तिचे पती अभिनेता महेश सुभेदारदेखील होते. त्यामुळे या दौऱ्यातील हा फोटो आहे. अमेरिका डायरी...लग्न, संसार, ट्रॅव्हल, #WorkwithFun, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, विशाखाने अभिनेता आणि डबिंग आर्टिस्ट महेश सुभेदार यांच्यासोबत 1998 साली लग्नगाठ बांधली. महेश हे अभिनेता असण्यासोबतच इंजिनिअरसुद्धा आहेत. तक्षक याग, लगी तो छगी, बेधुंद, अशी ही भाऊबीज, ही पोरगी कोणाची  अशा मोजक्या नाटक आणि चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.  

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन