अमेय वाघ दिसणार एकता कपूरच्या ‘बॉयगिरी - मेन विल बी बॉइज’ वेब सिरीजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2017 8:01 AM
चित्रपट, लघुपट आणि मालिकानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेब सिरीज चलती आहे.अक्षरश: चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्य़ा ...
चित्रपट, लघुपट आणि मालिकानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेब सिरीज चलती आहे.अक्षरश: चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्य़ा रंगताना दिसते आहे. 'कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण', 'स्ट्रगलर साला',एका पेक्षा एक वेब मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.या मालिकांना चांगला प्रतिसाददेखील मिळतोय.यानतंर आता बॉयगिरी ही वेबसिरीज ही रसिकांच्या भेटीला येणार आहे.टीव्हीवर चालणा-या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिएलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल, तर आता तुमच्यासाठी एकता कपूर आणतेय, भन्नाट वेबसिरीज. एकताचं ‘ऑल्ट बालाजी’ प्रोडक्शन बॉयगिरी ही मालिका, मैत्री, मस्ती आणि मुला-मुलांची एकमेकांशी व्यक्त होण्याची गंमतीशीर भाषा यावर आधारित ही वेब सिरीज असणार आहे.नावाप्रमाणेच ‘बॉयगिरी’ वेब सिरीज आपल्याला ब्रोमॅन्सच्या विश्वात घेऊन जाते.एकत्र राहताना त्यांच्यातला घट्ट होत जाणारा ऋणानुबंध, त्याचवेळी ‘मेन नेव्हर ग्रो अप’ ह्या तत्वावर दिसणारं त्यांचं मजेशीर वागणं, पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका पाहताना प्रत्येक पुरूषाला त्याच्या स्वत:च्या तरूणपणीच्या मित्रांची आठवण नक्कीच होईल.बॉयगिरीमध्ये प्रनवेश, अव्दैत, मनजोत, जतीन, रवी आणि बंदा अशी काही मनोरंजक पात्र दिसणार आहेत. ह्या सगळ्या मित्रांची मालिका दर एपिसोडगणिक मजेदार होत जाताना दिसेल. काही गंमतीशीर घटानाक्रमामध्ये अडकल्यावर व्यक्ति तितक्या प्रकृती ह्या न्यायाने ह्या मालिकेतली पात्र वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्त होतात. तेव्हा पाहणा-याची हसून-हसून अक्षरश: मुरुकुंडी वळते. अभिनेता अमेय वाघची ह्या मालिकेतली भूमिका एका खोडकर मुलाची आहे. ह्याविषय़ी तो अधिक सांगतो, “बॉयगिरी मालिकेतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अगदी ख-या आयुष्यातले काही जवळचे मित्र ह्य़ा मालिकेसाठी एकत्र आलेत. दर प्रोजेक्टमध् काही वेगळं करणं, ही तर बालाजीची खासियत. आणि ऑल्ट बालाजीच्या सर्व मालिका हिट गोष्ट पून्हा एकदा अधोरेखीत करतील. बॉयगिरी मालिका ब्रोमॅन्सला अजून नव्या पातळीवर घेऊन जाईल. मी बज्जुच्या भूमिकेत तुम्हांला दिसेन. हा बज्जू आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेल्या सगळ्या जुगाडूंपेक्षा मोठा जुगाडू आहे. तुम्हांला गरज नसली तरीही तो दरवेळा मदतीला तत्पर असतो.” बॉयगिरी वेब सिरीज अलवकरच ऑल्ट बालाजी एपवर सुरू होत आहे.