Join us

एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा अन् दुसरीकडे करण-तेजस्वीचं रोमँटिक व्हॅकेशन, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 4:28 PM

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान करणबरोबर व्हॅकेशनला गेली तेजस्वी प्रकाश, म्हणते- "प्रेम म्हणजे..."

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजन विश्वातील सेलिब्रिटी कपल आहेत. 'बिग बॉस १५' या रिएलिटी शोमधून त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. अनेकदा करण आणि तेजस्वी एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसायचे. अनेक पार्टी आणि कार्यक्रमांमध्येही त्यांना स्पॉट करण्यात आलं होतं. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

तेजस्वी आणि करण कुंद्राचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं. महिन्याभरापूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं असून ते वेगळे झाल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवर मात्र तेजस्वी किंवा करणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता अखेर तेजस्वीने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तेजस्वीने करणबरोबरचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

"करण : मी तिचे चांगले फोटो काढतो किंवा तेजस्वी : प्रेम म्हणजे ओळखणे...यातलं तुम्हाला हवं ते कॅप्शन घ्या", असं तिने म्हटलं आहे. तेजस्वीने शेअर केलेल्या या फोटोंवरुन त्यांच्यात सगळं काही आलबेल असल्याचं समजत आहे. तेजस्वी आणि करण सध्या परेदशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. 

तेजस्वी आणि करण गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आल्याने चाहतेही नाराज होते. आता अखेर तेजस्वीच्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  

टॅग्स :करण कुंद्रातेजस्वी प्रकाशटिव्ही कलाकार