छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा(Tarak Mehta Ka Ulta Chashma)ला जुलैमध्ये १४ वर्षे पूर्ण होणार आहेत. ही मालिका बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेची संकल्पना आणि यातील पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील गाजलेले एक पात्र म्हणजे बापूजीं. वेळ आल्यावर प्रत्येकाला आपल्या मताने समजून घेण्याचा मार्ग दाखवणारे बापूजी. पण तुम्हाला माहित आहे का की या भूमिकेसाठी अमित भट (Amit Bhatt) यांची पहिली पसंती नव्हती.
अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बापूजींची भूमिका साकारत आहे. गेल्या १४ वर्षांपासून तो या मालिकेचा एक भाग आहे आणि त्याला या भूमिकेतही चांगलीच पसंती मिळत आहे. कधी ते लहान मुलासारखे वागून सगळ्यांना खूप गुदगुल्या करतात, तर कधी खूप मोठे होऊन अनेकांना योग्य मार्ग दाखवतात. मात्र या मालिकेच्या सुरूवातीला बापूजींच्या भूमिकेसाठी अमित भट पहिली पसंती नव्हती. तर दुसऱ्या अभिनेत्याला ऑफर करण्यात आली होती. तो कलाकार तारक मेहता मालिकेमध्येच काम करतोय पण वेगळ्याच भूमिकेत. तो दुसरा तिसरा कोणी नसून दिलीप जोशी आहेत.
हो. हे खरं आहे. एका मुलाखतीत दिलीप जोशीने सांगितले होते की, त्याला पहिल्यांदा बापूजींच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. मालिकेचे निर्माते असित मोदी दिलीप जोशीला ओळखत होते, म्हणून त्यांनी त्यांना बापूजींची भूमिका ऑफर केली, परंतु दिलीप जोशी यांना वाटले की ते या भूमिकेत फिट बसणार नाहीत आणि त्यांनी ती करण्यास नकार दिला. यानंतर त्याला जेठालालची भूमिका करण्यास सांगण्यात आले. त्यालाही याबद्दल साशंकता होती पण तरीही त्याने होकार दिला आणि आपल्या मेहनतीने त्याने जेठालालचे पात्र आयकॉनिक बनवले.