अमिताभ बच्चन (amitabh bachchan) हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते. अमिताभ यांना आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गेली अनेक वर्ष अमिताभ बॉलिवूडवर स्वतःचं राज्य करत आहेत. वयाची ८० वर्ष उलटून गेली तरीही अमिताभ भारतीय मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. अमिताभ सध्या केबीसी १६ व्या सीझनचं सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ यांनी KBC 16 च्या मंचावर एक असं वक्तव्य केलं ज्याची चांगलीच चर्चा आहे. शहेनशाह अभिनेत्याचं हे वक्तव्य ऐकून सर्वांच्या काळजात धस्स झालंय.अमिताभ KBC 16 च्या मंचावर काय म्हणाले?अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या स्टूडिओत उपस्थित असलेल्या दर्शकांकडे पाहिलं. "तुम्हीच आहात ज्यामुळे मला ऊर्जा मिळते." अमिताभ यांनी हे वाक्य उच्चारतात सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुढे अमिताभ काहीसे भावुक झाले आणि म्हणाले की, "ज्या दिवशी हा शो बंद होईल त्याच दिवशी मी सुद्धा बंद होईल." अमिताभ यांच्या या वाक्याने सर्वांच्या काळजात धस्स झालं. असं बोलू नका, अशी विनंती लोकांनी अमिताभ यांना केली.
बिग बी पुढे म्हणाले, "मी अत्यंत योग्य बोलतोय. शेवटी मी एक कलाकार आहे त्यामुळे माझ्यातल्या कलाकाराला अशाच गोष्टी जिवंत ठेवतात. तुम्ही मोठ्या पडद्यावर मला बघता. मी जे काही करेल ते तुम्हाला प्रचंड आवडतं. तुम्ही त्या गोष्टीचं कौतुक करता. जोरजोरात टाळ्या वाजवता. तुमच्या टाळ्या हेच माझ्यासाठी जेवणासारखं आहे." अशाप्रकारे अमिताभ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अमिताभ गेल्या २५ वर्षांपासून KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत.