Join us

ग्रेट भेट ! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या विनोदवीरांना मिळाली महानायकाच्या कौतुकाची थाप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 5:27 PM

सगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचासुद्धा आवडता शो बनला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमानने रसिकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. ही हास्यजत्रा सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बाबतीत हास्यजत्रा नेहमीच नशीबवान ठरली आहे. आता ही हास्यजत्रा आठवड्यातले चार दिवस म्हणजे सोमवार ते गुरुवार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या शोमध्ये कलाकारांची भरपूर धमाल, मस्ती आणि मनोरंजनने ठासून भरलेली  स्किट्स रसिकांचे भरघोस मनोरंजन करत असतात.कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं कलाकारांचं ट्युनिंग यामुळे प्रत्येकजण रसिकांना खळखळून हसवतो.

कार्यक्रमाच्या निमित्तानी सुरुवातीलाच समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव ह्या अफलातून विनोदवीरांच्या दोन जोड्या महाराष्ट्राला मिळाल्या. नव्या-जुन्या विनोदवीरांच्या एकत्रित सादरीकरणानी यातल्या सर्वच कलाकारांना आणि विनोदवीरांच्या सर्व जोड्यांना महाराष्ट्रानी डोक्यावर घेतलं आहे. अरुण कदम, पंढरीनाथ कांबळे, प्रभाकर मोरे ह्या अनुभवी विनोदवीरांबरोबर गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार भोजने, श्यामसुंदर राजपूत, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, दत्तू मोरे, निमिष कुलकर्णी हे सर्व कलाकार आज मराठी रसिकांचे लाडके झाले आहेत.

 

सगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचासुद्धा आवडता शो बनला आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे बीग बी अमिताभ बच्चन यांचं. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं, 'तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं  काम करताहात.

 

 

ते सतत असंच करत राहा', असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन