पुन्हा रंगणार प्रश्नांचा रंगमंच,कौन बनेगा करोडपतीचं नवं पर्व ऑगस्टपासून रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:04 PM2021-07-19T16:04:51+5:302021-07-19T16:08:03+5:30
महानायक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव केबीसीशी नाव जोडलं गेलं. त्यामुळे या केबीसीला एक परिमाण लाभलं होतं.
पुन्हा एकदा रंगणार प्रश्नांचा रंगमंच, पुन्हा उलगडणार अनेकांचं भावनिक विश्व, पुन्हा रंगणार गप्पांची मैफल आणि पुन्हा कुणी तरी सामान्यातील सामान्य बनणार करोडपती. कारण लवकरच कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत असतो. आपल्या जीवनातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. मात्र प्रत्येकालाच त्याची स्वप्नं पूर्ण करता येतात असं नाही. मोजक्या मंडळींची स्वप्न साकार होतात. मात्र अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. या शोची जाहीरातही टीव्हीवर झळकु लागली आहे. हा कार्यक्रम येत्या २३ ऑगस्टपासून प्रसारित होणार असल्याचं कळतंय.
महानायक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव केबीसीशी नाव जोडलं गेलं. त्यामुळे या केबीसीला एक परिमाण लाभलं होतं. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. बिग बींचा अनोखा अंदाज, शोमध्ये येणारे स्पर्धक, त्यांच्या बिग बींचा संवाद, शोमधून समोर येणा-या विविध भावनिक गोष्टी यामुळे टीआरपीमध्येही शो अव्वल स्थानावर असतो.
केबीसीपुढे इतर रियालिटी शोची जादू फिकी पडते. यांत सलमानच्या बिग बॉस आणि इतर कॉमेडी तसंच सिंगिंग रियालिटी शोचा उल्लेख करावा लागेल. केबीसीचे १२ही पर्व प्रचंड गाजले. प्रचंड लोकप्रियता पाहून केबीसीच्या निर्मात्यांनी या शोचं १३ पर्व लवकरच रसिकांच्या भेटीला आणायचं ठरवलं आहे. याचे सूत्रसंचालन पुन्हा महानायकच करणार हे काही वेगळं सांगायलाच नको. त्यामुळे जस्ट वेट एंड वॉच.