Join us

"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 08:50 IST

प्रीतिका आणि अभिनेता हर्षद अरोरा 'बेइंतहा' मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या मालिकेतील त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र आता प्रीतिकाने हर्षद अरोरावर गंभीर आरोप केले आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची बहीण प्रीतिका राव हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. प्रीतिकाने अनेक हिंदी टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. प्रीतिकाची 'बेइंतहा' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत प्रीतिका आणि अभिनेता हर्षद अरोरा मुख्य भूमिकेत होते. 'बेइंतहा' मालिकेतील त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र आता प्रीतिकाने हर्षद अरोरावर गंभीर आरोप केले आहेत. 

बेइंतहा या मालिकेतील प्रीतिका आणि हर्षदचे काही रोमँटिक सीन एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र हे सीन पाहून अभिनेत्रीचा पारा चढला. यावरुन अभिनेत्रीने त्या चाहत्याला खडे बोल सुनावत सहकलाकार असलेल्या हर्षद अरोरावर गंभीर आरोप केले. याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. यामध्ये प्रीतिका चाहत्याला म्हणते, "हे व्हिडिओ तुझ्या अकाऊंटवरुन पोस्ट करताना तुला लाज वाटली पाहिजे होती. इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत शरीरसंबंध असलेल्या व्यक्तीसोबत माझे व्हिडिओ पोस्ट करू नका यासाठी मी वारंवार विनंती केली होती".

"माझ्या इच्छेविरुद्ध तू हे व्हिडिओ शेअर केले आहेत. तुला याचे परिणाम भोगावे लागतील. बेइंतहामध्ये ९५ टक्के सीनमध्ये काहीच नव्हतं. त्यात फक्त ५ टक्के रोमँटिक सीन होते. आणि तू फक्त तेच शेअर करत आहेस, तेदेखील माझ्या इच्छेविरुद्ध...लाज वाटली पाहिजे. तुला तुझे कर्म भोगावे लागतील", असं प्रीतिकाने म्हटलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी