Join us

Video: देवेंद्र जी तुमच्याबरोबर असताना कोणतं गाणं गातात? अमृता फडणवीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 1:39 PM

Amruta fadnavis: अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नाही तर ही जोडी एकत्र असताना कोणतं गाणं मिळून गातात हेदेखील त्यांनी सांगितलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या गाण्याची आवड साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे अनेकदा त्या चर्चेतही असतात. असाच एक गाण्याचा किस्सा त्यांनी ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात सांगितला आहे. अलिकडेच त्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नाही तर ही जोडी एकत्र असताना कोणतं गाणं मिळून गातात हेदेखील त्यांनी सांगितलं.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर 'किचन कल्लाकार' या शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सूत्रसंचालक संकर्षण कऱ्डाडे अमृता यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काही प्रश्न विचारतो. यामध्येच तुम्ही दोघंही घरी असताना कोणतं गाणं एकत्र गातात असा प्रश्न विचारतो. यावर अमृता फडणवीसांनी भन्नाट उत्तर दिलं. त्यांचं हे उत्तर ऐकून सेटवर एकच हाशा पिकला.

''तुमच्या दोघांचं मिळून कोणतं गाणं फेव्हरेट आहे?'' असा प्रश्न संकर्षण विचारतो. त्यावर "पिया तू अब तो आ जा हे गाणं मी पूर्वी खूप म्हणायचे. त्यावेळी या गाण्यातलं फक्त मोनिका...ओ..माय डार्लिंग हे एवढंच ते म्हणायचे.  पण, मी त्यांना कायम सांगायचे अमृता...ओ...माय डार्लिंग म्हणा'', असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर ''तुम्ही असचं हातात झाऱ्या घेऊन म्हणायच्यात का?" असा दुसरा प्रश्न संकर्षण विचारतो. त्यावर "झाऱ्या नाही लाटणं घेऊन म्हणायचे", असं मजेशीर उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं. विशेष म्हणजे त्यांच्या या शेवटच्या उत्तराने सर्वत्र हाशा पिकला.

दरम्यान, अलिकडेच या शोचा आणखी एक प्रोमो व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळी किती आवडते हे सांगितलं होतं. यावेळी देवेंद्रजी ३५ पुरणपोळ्या सहज खायचे असंही त्यांनी या सेटवर सांगितलं. त्यामुळे या जोडीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसटेलिव्हिजन