छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोची रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. सुरुवातीला खिलाडी अक्षय कुमार आणि त्यानंतर बॉलिवूडचा दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालक असलेला हा रिअॅलिटी शो रसिकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. लवकरच या रिअॅलिटी शोचं दहावं पर्व रसिकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी होणारं मराठमोळं नाव म्हणजे अमृता खानविलकर.
अमृतासोबतच कोरिओग्राफर धर्मेश, आरजे मलिष्का, अभिनेत्री अदा खान, तेजस्विनी प्रकाश, करिश्मा तन्ना, ये है मोहब्बतें फेम करण पटेल, कॉमेडियन बलराज सयाल, शिवीन नारंग, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीसुद्धा 'खतरों के खिलाडी' या पर्वात सहभागी होणार आहे.
सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी समोर आल्यानंतर आता त्यांना मिळालेल्या मानधनावर चर्चा रंगत आहेत. प्रत्येक कलाकाराला त्याच्या लोकप्रियतेनुसार मानधन दिले गेले आहे. या सगळ्यांमध्ये करण पटेल सगळ्यात महागडा स्पर्धक आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार करणला स्पेशल एडिशनचे 5-6 लाख इतके मानधन देण्यात आले आहे. स्पेशल एडिशनचे असे अंदाजे 10 एपिसोड असणार आहेत.
बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, अमृताला या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी एका भागाचे दीड लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे. तिच्यासोबतच भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी, तेजस्विनी प्रकाश यांना देखील तितकेच मानधन मिळणार आहे. तर शिवीन नारंग, अदा खान, करिश्मा तन्ना यांना देखील दोन लाख रुपये मिळणार आहेत. करण पटेलनंतर सगळ्यात जास्त मानधन धर्मेशला मिळाले असून त्याला एका भागाचे तब्बल चार लाख रुपये मिळणार आहेत.
बलराज सयालला एका भागासाठी एक लाख रुपये तर आर जे मलिष्काला सगळ्यात कमी म्हणजेच एका भागासाठी 90 हजार रुपये मिळणार आहेत.
सहभागी होणा-या कलाकारांची यादी समोर आल्यानंतर आता त्यांना मिळालेल्या मानधनावर चर्चा रंगत आहेत. प्रत्येक कलाकाराला त्याची लोकप्रियता आणि त्यांच्या क्षमतेनुसार मानधन दिले गेले आहे. या सगळ्यांमध्ये करण पटेल सगळ्यात महागडा स्पर्धक आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार करणला स्पेशल एडिशनचे 5-6 लाख इतके मानधन देण्यात आले आहे. स्पेशल एडिशनचे असे अंदाजे 10 एपिसोड असणार आहे.