Join us

'झलक दिखला जा १०'च्या सेटवर अमृता खानविलकरची आई झाली भावुक, माधुरी दीक्षितला केली ही विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 12:28 PM

छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhala Ja)चा दहावा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhala Ja)चा दहावा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शोमध्ये अमृता आपल्या डान्स कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवत आहेच मात्र परिक्षकांचीही मनं जिंकताना दिसत आहे. दरम्यान या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत अमृताची आई भावनिक झालेली दिसत असून ती परिक्षकाच्या खुर्चीत बसलेल्या माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ला अमृतासोबत मंचावर उभे राहण्याची विनंती करताना दिसते आहे. इतकेच नाहीतर त्यांच्या विनंतीचा मान धकधक गर्लने देखील ठेवला आहे.

अमृता खानविलकरचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, अमृताची आई माधुरी दीक्षितला नमस्कार करून माझ्यासाठी अमृतासोबत दोन मिनिटं मंचावर याल का?, अशी विनंती केली. त्यावर माधुरीनं जरूर म्हटलं आणि मंचावर आली. त्यानंतर अमृताने सांगितलं की माझी आई इतकी इमोशनल झाली कारण माझी जर्नी ही माधुरी दीक्षित यांच्यापासूनच झाली. पुण्यात गणेशोत्सवात मी ४ वर्षांची असताना पहिल्यांदा माधुरी मॅमच्या अखियां मिलावू या कभी अखियां चुराऊ...या गाण्यावर डान्समधून मी माझ्या कारकीर्दीची सुरूवात केली होती आणि दरवर्षी मी त्यांच्याच गाण्यावर डान्स करायचे. तो प्रवास आणि आता मी त्यांच्यासमोर उभी आहे व परफॉर्म करत आहे.

अमृता खानविलकरने पुढे म्हटले की, माधुरी दीक्षित मॅम तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील अभिनेत्रींसाठी प्रेरणा आहात. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. त्यावर माधुरी दीक्षित म्हणाली, अमृता सारख्या मुली जेव्हा म्हणतात की मी त्यांच्यासाठी प्रेरणा आहेत. मात्र त्या त्यांच्या मेहनत आणि टॅलेंटमुळे आज यशस्वी आहेत आणि मला त्यांचा अभिमान वाटतो.
टॅग्स :माधुरी दिक्षितअमृता खानविलकर