Join us

'लक्ष्मी निवास' मालिकेत रंजक वळण, जयंत आणि विश्वाचा होणार सामना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:45 IST

Lakshmi Niwas Serial : 'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंतचं विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललंय.

'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंतचं विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललंय. आता काय तर जाह्नवी जयंतसाठी टोपणनाव शोधू शकत नाही, म्हणून जयंत तिला शिक्षा देतो. पण तिचं दु:ख पाहून तो स्वतःलाही शिक्षा करतो. विश्वाच्या खोलीत तनूला जाह्नवीने दिलेली साखळी सापडते, ज्यामुळे विश्वाला पुन्हा जाह्नवीची आठवण होते. दुसरीकडे, जयंत जाह्नवीचा फोन हातात घेतो आणि तिने विश्वाला पाठवलेल्या व्हॉइस नोट आपल्या फोनवर ट्रान्सफर करतो. ऑफिसमध्ये गेल्यावर तो संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकतो. विश्वाने दिलेल्या उत्तरावरून जयंत या निष्कर्षावर पोहोचतो की जान्हवीने हे लग्न फक्त आणि फक्त विश्वाच्या आग्रहाखातर केला आहे. 

जयंत या मॅडविषयी माहिती गोळा करतो. जयंतचा गैरसमज वाढत चाललाय. जयंत विश्वाच्या मागावर असताना एका दुकानात पोहोचतो, जिथे जाह्नवीचं गाणं वाजत असतं, ज्यामुळे जयंत आणि विश्वा दोघंही भारावून जातात. जयंत चुकून विश्वा समजून दुसऱ्याच माणसाचा पाठलाग करतोय आणि त्याला मारहाण करतो. जयंत, विश्वाला मारल्याच्या आनंदात जाह्नवीसोबत डिनर एन्जॉय करतो आणि ते दोघं काही रोमँटिक क्षण शेअर करतात. 

जयंत आणि विश्वासचा सामना होणार का?

तर दुसरीकडे  भावना, गाडे-पाटील यांच्याशी बोलताना सांगते की तिचं संपूर्ण आयुष्य आनंदीभोवती फिरतं आणि तिच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाला जागा नाही. हे ऐकून सिद्धू अस्वस्थ आहे. इकडे जयंतला आपलं घड्याळ हरवल्याचं लक्षात आल्यावर, जिथे मारहाण केली तिथे परत जाण्याचा निर्णय जयंत घेतो आणि तिथे गेल्यावर असं काही घडत जे पाहून प्रेक्षक हैराण होणार आहेत. जयंत आणि विश्वासचा सामना होणार का? भावनाचा लग्न न करण्याचा विचार सिद्धू बदलू शकेल का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.