Join us  

"...आणि कुब्जा श्रापमुक्त झाली", मराठमोळ्या अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 11:51 AM

मराठमोळ्या अभिनेत्रीचं हटके फोटोशूट चर्चेत आले आहे.

सध्या नवरात्री निमित्त कलाकार स्पेशल फोटोशूट करत आहेत. या कलाकारांचे फोटोशूट देखील चर्चेत येत आहे. मराठी कलाविश्वातील अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे. तिने कुब्जाच्या गेटअपमध्ये फोटोशूट केले आहे.

अश्विनी महांगडे हिने नवरात्रीनिमित्त विविध लूकमध्ये फोटोशूट केले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, #सौंदर्य_कुब्जेचे_घन_निळ्यास_उमगले || मथुरेत कुब्जा ही कंसाची दासी होती. ती रोज कंसासाठी चंदन उगळण्याचे काम करायची. कुब्जाचे हे अपार प्रेम आणि भक्ती पाहून कंसालाही खूप आनंद व्हायचा. तिला कुबड होते म्हणून सगळे तिला कुब्जा म्हणायचे. मथुरेत फिरत असताना भगवान श्रीकृष्णांना चंदनाचा सुगंध आला. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर एका कुबडी स्त्री अतिशय आनंदाने हातात चंदन, फुले, हार घेऊन जात होती. भगवान श्रीकृष्णाने तिला अडवले आणि विचारले, "सुंदरी तू हे चंदन घेऊन कुठे निघाली आहेस?" श्रीकृष्णांनी कुब्जाला सुंदर म्हटल्यावर ती रागाने म्हणाली, "एक कुरूप, कुबड्या स्त्रीला तुम्ही सुंदर म्हणून तिचा अपमान करत आहात. मला मथुरेत सगळे कुब्जा म्हणतात, हिणवतात तुम्ही मला कुब्जा म्हंटल असत तर मी एवढी अपमानीत झाले नसते. "

तिने पुढे लिहिले की, श्रीकृष्णाने त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, "मी तुझ्यावर हसलो नाही, की तुला सुंदरी म्हणून हिणवले नाही कारण तू खरच सुंदर आहेस. मी रूप नाही तर मन बघतो आणि तू दिसायला कुरूप असलीस तरी मनाने खूप सुंदर आहेस. तुझ्या कुरुपतेचा श्राप आता संपला आहे. 

कुरप असशील तू, तरीही...

कुब्जा घाबरते. " मी हे चंदन कंसासाठी घेवून निघाली आहे. त्याला समजले तर तो मला जिवंत ठेवणार नाही. माझी वाट सोडा." "ज्या हातांना मी पकडले आहे, त्यांना कोणी काहीच करू शकत नाही." कुब्जाचा डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने कृष्णाला चंदन लावायला हात वर केला परंतु श्रीकृष्णापर्यंत तिचा हात पोहचेना. श्रीकृष्णाने तिच्या हनुवटीला पकडले आणि आश्चर्य घडले कुब्जाचे सुंदरित रूपांतर झाले आणि कुब्जा श्रापमुक्त झाली. कुरप असशील तू, तरीही सुंदर तू कारण बाह्यमनापेक्षा भक्तीत माझ्या अंतर्मन जोपासलेस तू.., असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.  

टॅग्स :अश्विनी महांगडे