आणि रेशम टिपणीस बनली बिग बॉसची नवी कॅप्टन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 12:56 PM
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसने सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरू होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह ...
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसने सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरू होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा होती. “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. सदस्यांच्या एकमताने नंदकिशोर, रेशम आणि सई हे तिघे या आठवड्याच्या कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे राहिले. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगले “चाल–वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य. सदस्यांना ध्येयाच्या आणखीन जवळ नेण्यासाठी बिग बॉस यांनी कॅप्टनसीच्या उमेदवारांना “चाल–वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य सोपावले. ज्यामध्ये रेशम, सई आणि नंदकिशोर हे उमेदवार होते. या टास्कमध्ये मेघा–सईचे रेशमसोबत वाद विवाद झाले. नंदकिशोर यांनी टास्कमधून काही शारीरिक कारणास्तव माघार घेतली आणि सई आणि रेशम मध्ये पुढे हा टास्क रंगत गेला. टास्कच्या दरम्यान सईच्या नकळत रेशम सईचे अर्धे पाऊल शूज मधून काढण्यात यशस्वी ठरली. पण तिला अडवत असताना सईच्या पाठीला हिचका बसला. तसेच तिच्या पायाला देखील इजा झालेली होती आणि पाठदुखीमुळे तिने सुद्धा बऱ्याच वेळानंतर या टास्कमधून माघार घेतली आणि रेशम या टास्कमध्ये विजयी ठरत बिग बॉस मराठीच्या घराची नवी कॅप्टन बनली. मेघा, पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा मध्ये काल झालेल्या टास्क वरून थोडी नाराजी बघायला मिळणार आहे. नक्की काय आहे नाराजीचे कारण ते आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळणार आहे.त्यामुळेच “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार? हे आजच्या भागामध्ये ठरणार आहे.बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू होऊन अनेक दिवस उलटले आहेत. या कार्यक्रमात कोण जिंकणार यावरून स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरू आहे. आपणच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा विजेता व्हावे असे घरातील प्रत्येकाला वाटत आहे आणि त्यासाठी ते मेहनत देखील घेत आहेत. आता या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या फायनलला आता थोडे दिवस राहिल्यामुळे घरातील प्रवास आणखीनच अवघड होत जाणार आहे. Also Read : अस्ताद काळे या अभिनेत्रीसोबत आहे नात्यात, बिग बॉस मराठीमध्ये दिली कबुली