Join us

'सही पकडे है' असं म्हणणारी अंगुरी भाभी आता बोलणार फाड फाड इंग्लिश!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 5:47 PM

आपले इंग्रजीचे ज्ञान सुधारण्‍याकरिता अंगूरी भाभी अनिता भाभीद्वारे चालवण्‍यात येणा-या एका प्रौढ शिक्षा केंद्रात जाऊ लागते.

'भाभीजी घर पर हैं'च्‍या प्रफुल्लित अंगूरी भाभीचा डायलॉग 'सही पकडे हैं' घराघरात लोकप्रिय आहे. तिच्‍या उत्‍तर प्रदेशीय भाषेसह इंग्रजी शब्‍दांचा अनोखा उच्‍चार रसिकांना खूपच आवडला आणि यामुळेच ती चाहत्‍यांची आवडती बनली. 'आय एम सारी' सारख्‍या इंग्रजी शब्‍दांमध्‍ये तिचा साधारण तरीही लक्ष वेधून घेणारा ट्विस्‍ट आणि 'घूइयां' व 'चिरांद' सारख्‍या शब्‍दांचा वारंवार वापर केला जाणे रसिकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. 

एक अनोखी हटके स्टाइल आणि आपली भाषेचा वापर करणा-या साध्‍या आणि सुंदर अंगूरी भाभीने केवळ एक व्यक्ती सोडली तर सोडून रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.या शोच्‍या एका आगामी एपिसोडमध्‍ये 'घंटा मॅन' नावाचा हा इसम अंगूरीने चुकून केलेल्या अपमानामुळे फारच नाराज झालेला दिसेल. 'दारुवाला' नावाच्‍या एका आगळ्यावेगळ्या क्‍लायंटद्वारे तिवारीला पाच लाख रुपयांची एक मोठी ऑर्डर देण्‍यात येते. अंगूरी भाभीच्‍या स्‍टाईलने नाराज तितकाच त्रस्‍त होऊन तो तिवारीला ऑर्डर रद्द करण्‍याची धमकी देतो. आपल्‍या प्रिय अंगूरी भाभीच्‍या एका 'सॉरी'ने देखील ही समस्‍या सुटत नाही आणि तिवारीजी रागावतो. 

आपले इंग्रजीचे ज्ञान सुधारण्‍याकरिता अंगूरी भाभी अनिता भाभीद्वारे चालवण्‍यात येणा-या एका प्रौढ शिक्षा केंद्रात जाऊ लागते. तिच्‍या या शैक्षणिक प्रवासात या शोच्‍या इतर प्रख्‍यात व्‍यक्तिरेखा टीका, मल्‍खान व टीकू बरोबरच हप्‍पू, कमिश्नर व गुलफाम अली देखील सामील होतात. हे नाट्य अधिकच मजेशीर होणार आहे, कारण या केंद्राचा टीचर असणार आहे विभूती. तो अंगूरी भाभी सोबत फ्लर्ट करताना दिसणार आहे. या सगळ्यामध्‍ये समस्‍या अजूनच वाढणार आहे,कारण तिवारी अंगूरी भाभीला नापास करण्‍याचा प्रयत्‍न करतो, तर विभूतीला वाटते की, ती चांगल्‍या गुणांनी पास व्‍हावी. 

आपल्‍या भूमिकेतील या रंजक बदलाविषयी सांगताना शुभांगी अत्रे उर्फ अंगूरी म्‍हणाली, ''खरे सांगायचे तर, मला एका अशा स्‍त्रीची भूमिका साकारताना अत्‍यंत आनंद होत आहे, जी स्‍वत:ला बदलण्‍यासाठी विकसित होऊ व शिकू इच्छिते. मला वाटते की, शिकण्‍याचे काही वय नसते आणि अशाप्रकारे आपण सबळ बनू शकतो. या ट्रॅकच्‍या माध्‍यमातून आम्‍ही ही संकल्‍पना दाखवू इच्छितो आणि प्रौढ शिक्षणाला प्रोत्‍साहन देऊ इच्छितो. या देशाचे भविष्‍य देखील हजारो महिलांच्‍या हातात आहे, ज्‍यांच्‍यामध्‍ये शिकण्‍याचा उत्‍साह आहे आणि सामाजिक दबावाखाली येऊन ज्‍या स्‍वत:ला मागे ठेवू इच्छित नाहीत. 

शिक्षणामध्‍ये लोकांना स्‍वतंत्र करण्‍याची ताकद असते आणि ते जीवन अधिक चांगले बनवण्‍याचे एक महत्‍त्‍वपूर्ण साधन आहे. आम्‍ही हेच शिकून मोठे झालो आहोत आणि खरेतर मला वाटते की, माझ्या मुलीनेही यावर विश्‍वास ठेवावा. अंगूरी भाभीला जे प्रेम मिळाले आहे, ते पाहता मला खात्री आहे की दर्शक देखील याला पाठिंबा देतील. कारण, तिने स्‍वत:ला शिक्षित करण्‍याचा निर्णय घेतला आहे. आमच्‍या ब-याच एपिसोड्सप्रमाणे, हा एपिसोड देखील खूपच रंजक होणार आहे.