श्रीदेवी ही भारतीय सिनेमामधील पहिली स्त्री सुपरस्टार मानली जाते. अतिशय गुणी आणि ताकदीने साकारलेल्या व्यक्तिरेखांमधून श्रीदेवीने अनेक दशके रूपेरी पडद्यावर राज्य केले. तिची सिनेमॅटिक कारकीर्द साजरी करण्यासाठी अनिल कपूर आणि जितेंद्र हे स्टार प्लसवरील 'डान्स+ ४'च्या श्रीदेवी ट्रिब्यूट एपिसोडमध्ये सेलेब्रिटी अतिथी म्हणून आले होते.
अनिल कपूर यांनी श्रीदेवीसोबत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले. श्रीदेवीची शक्तीशाली स्क्रीन उपस्थिती आणि एक कलाकार म्हणून तिला जे वलय लाभले. त्याबद्दल ते म्हणाले,'श्रीदेवीजी ह्या एक उत्तम एंटरटेनर होत्या. त्या आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्वासह अख्खा स्क्रीन भरून टाकत असे. त्यांच्यासोबत मला चालबाजसाठी विचारण्यात आले होते. त्या ह्या चित्रपटात दुहेरी भूमिका करत होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर मला काय मिळणार असा विचार माझ्या मनात आला आणि मी तो चित्रपटनाकारला. अर्थातच त्यांनी आपल्या दुहेरी भूमिका उत्तम पद्धतीने साकारल्या, ज्याची तुलना कोणीच करू शकणार नाही.' निःशंकपणे श्रीदेवीच्या जाण्याने आपल्या आयुष्यात कधीही भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.अनिल कपूर करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत असणार आहे. २०२०मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.