Join us

भक्तांच्या समस्यांचं निरसन करणाऱ्या स्वामी अनिरुद्धाचार्य यांची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री? घराबाहेर झाले स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 16:48 IST

भक्तांच्या विविध प्रश्नांना उत्तरं देणारे स्वामी अनिरुद्धाचार्य बिग बॉसच्या घराबाहेर मीडियाशी बोलताना स्पॉट झाले आहेत (salman khan, bigg boss 18)

सलमान खानच्या हिंदी 'बिग बॉस 18'ची उत्सुकता शिगेला आहे. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या खास अंदाजात 'बिग बॉस 18'चं सूत्रसंचालन करायला सज्ज आहे. सलमान खान त्याच्या खास स्वॅगमध्ये पुन्हा एकदा 'बिग बॉस 18'चं सूत्रसंचालन करायला सज्ज आहे. अशातच 'बिग बॉस 18'मध्ये कोण सहभागी होणार यासाठी सर्वांना अटकळ बांधायसा सुरुवात केलीय. तोच 'बिग बॉस 18'च्या सेटबाहेर अनिरुद्धाचार्य स्वामी स्पॉट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनिरुद्धाचार्य स्वामी बिग बॉसमध्ये जाणार?

अनिरुद्धाचार्य महाराज अचानक 'बिग बॉस 18'मध्ये जाणार या चर्चा का सुरु झाल्यात त्यामागे एक कारण आहे. झालं असं की, अनिरुद्धाचार्य महाराज 'बिग बॉस 18'च्या सेटबाहेर स्पॉट झाले. महाराज यांनी उपस्थित मीडिया आणि पापाराझींसोबत खास बातचीत केली. त्यामुळे अनिरुद्धाचार्य महाराज 'बिग बॉस 18'मध्ये एन्ट्री घेणार की ते पाहुणे म्हणून ग्रँड फिनालेमध्ये सहभागी होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. याविषयी अधिकृत माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

'बिग बॉस 18' ची उत्सुकता शिगेला

'बिग बॉस 18'मध्ये कोण दिसणार याची उत्सुकता शिगेला आहे. दरम्यान सलमान खानचा 'बिग बॉस 18'च्या सेटवरील फोटो व्हायरल झालाय. या फोटोत रॉयल ब्लू ब्लेजर आणि काळ्या रंगाच्या शर्ट आणि पँटमध्ये भाईजानचा अनोखा स्वॅग पाहायला मिळतोय. सलमान पुन्हा एकदा  'बिग बॉस 18'चं अँकरींग करायला सज्ज  आहे. आता बिग बॉसमध्ये कोण स्पर्धक दिसणार  हे उद्याच्या भागात पाहायला मिळेल. 'बिग बॉस 18'चा ग्रँड प्रिमियर उद्या ९ वाजता कलर्स टीव्हीवर बघायला मिळेल. 'टाईम का तांडव' अशी या सीझनची थीम आहे.

 

टॅग्स :बिग बॉससलमान खान