Join us

अनिता हसनंदानी ते दिशा वकानी मालिकाविश्वातल्या लोकप्रिय अभिनेत्री सध्या काय करतात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 1:24 PM

मालिका विश्वात दिशा वाकानी पासून ते अनिता हंसनंदानी सगळ्यांनीच रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. आज अभिनयापासून दूर जात असे करतायेत एन्जॉय.

अभिनय क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सुरुवातीपासून रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहिले. मात्र लग्नानंतर अभिनय क्षेत्रातून दूर जात संसारात रमल्या. सर्वात लाडकी आणि लोकप्रिय दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून रसिकांचे मनोरंजन केले. मात्र बाळाच्या जन्मानंतर मालिकेतून ब्रेक घेत संसारात रमली. गेल्या काही वर्षापासून दिशा मालिकेतून गायब आहे. दया बेन कधी झळकणार याचीच चाहते वाट पाहत असले तरी दया बेन अजूनतरी पुन्हा परतणार याविषयी अजूनतरी तिने स्पष्टीकरण दिलेले नाहीय.

अभिनेत्री माही विजने अनेक मालिकेतून रसिकांचे मनोरंजन केले. पण आई झाल्यानंतर तिनेही ब्रेक घेतला. मालिकेच्या शूटिंगला बराच वेळ देणे तिलाही शक्य नव्हते. शेवटी तिने ब्रेक घेत मुलीला वेळ देण्याला अधिक प्राधान्य दिले.

अभिनेत्री अनिता हसनंदानीने टीव्हीवर अनेक मालिकेतून रसिकांचे मनोरंजन केले आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर ती संगोपनात व्यस्त झाली. बाळासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतानाचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

अभिनेता मोहित मलिकची पत्नी  अभिनेत्री अदिती मलिकही लग्नानंतर अभिनय क्षेत्रात फार सक्रीय नव्हती.लग्नाच्या दहा वर्षानंतर ती आई होणार असल्याची गुड न्यूज तिने चाहत्यांसह शेअर केली होती. बाळाच्या जन्मानंतर आता ती पर्सनल लाईफ एन्जॉय करत आहे.

'देवों के देव महादेव' फेम पुजा बॅनर्जी कुणाल वर्मासोबत जवळपास १० वर्षे रिलेशनशीपमध्ये होती.लॉकडाऊनमध्येच दोघांनी लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. काही महिन्यात पुजाने बाळाला जन्म दिला होता. आता ती कोणत्याच मालिकेत झळकत नाहीय.

अभिनेत्री कांची कौल आता मालिकेत झळकत नसली तरी तिची लोकप्रियता आजही कायम आहे. अभिनेता शब्बीर अहुलवालियासोबत तिने लग्न केले आहे.  कांचीने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर इंडस्ट्रीला राम राम ठोकला.

टॅग्स :दिशा वाकानीअनिता हसनंदानी