अंजली आनंदने कथन केले ग्लॅमर विश्वातील पडद्यामागील सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 1:55 PM
अभिनेत्री तथा मॉडेल अंजली आनंदचे म्हणणे आहे की, मनोरंजन तथा ग्लॅमर विश्वात आजही स्थूल लोकांचा स्वीकार केला जात नाही. ...
अभिनेत्री तथा मॉडेल अंजली आनंदचे म्हणणे आहे की, मनोरंजन तथा ग्लॅमर विश्वात आजही स्थूल लोकांचा स्वीकार केला जात नाही. लॅक्मे फॅशन वीक विंटर,फेस्टिव्ह-२०१७ मध्ये वेंडेल रॉड्रिक्सच्या प्रायमेर संग्रहासाठी रॅम्प वॉक करणाºया अंजलीने म्हटले की, ‘करिअरच्या सुरुवातीला मला काम शोधण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. मला अतिशय दु:खदपणे सांगावेसे वाटते की, भारतात प्लस साइज मॉडेल नाहीत. कारण स्थूल लोकांना मॉडलिंग तथा अभिनय क्षेत्रात सहजासहजी काम मिळत नाही. ग्लॅमर उद्योगात तर काम शोधणे खूपच अवघड असते. अंजलीच्या मते, ‘मी जेव्हा स्थूल असतानाच मॉडलिंग सुरू केली होती, तेव्हा मला सतत वाटत होते की, मला या देशात काम मिळणार नाही. लोकांनी मला पोस्टर्सवर बघितले अन् अचंबित झाले. कारण लोकांना पोस्टरवर एखादी जाड किंवा स्थूल असलेल्या मुलीला स्वीकार करणे अवघड होते. मला असे वाटते की, आपण जे आहोत, त्यात समाधानी असायला हवे. आपण जे परिधान करतो, त्यात आपण स्वत:ला कम्फर्ट समजायला हवे. वास्तविक आता हा विचार हळूहळू बदलत असल्याने मी समाधानी आहे. ‘ढाई किलो प्रेम’ या मालिकेनंतर अंजली प्रसिद्धी झोतात आली. या शोच्या निर्मात्यांनी तिला वजन वाढविण्यास सांगितले होते, तेव्हा अंजलीने त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. कारण त्यावेळी अंजलीचे वजन १०८ किलो होते. त्यापेक्षा अधिक वजन वाढविण्यास अंजली अजिबातच तयार नव्हती. हा शो अशा दोन लोकांवर आधारित आहे जे स्वत: स्थूल आहेत, परंतु त्यांना जोडीदार प्रचंड गुणी हवे असतात. अर्थात हे गुण वजनाविषयी असतात.