Join us

अंजली बाईंच्या बॅचलर पार्टीला साउथचा तडका! अक्षयाच्या लुंगीतल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 11:25 AM

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील पाठकबाई आणि राणादा म्हणजेच चाहत्यांचे लाडके कलाकार अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई आणि राणादा म्हणजेच चाहत्यांचे लाडके कलाकार अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडते, पण त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप भावते. आता हे दोघे खऱ्या आयुष्यतही एकमेकांचे लाइफ पार्टनर होणार आहेत. आता लवकरच त्यांचे लवकरच लग्न करणार आहेत. त्यामुळे सध्या त्या दोघांचे केळवणाचे फोटो समोर येत आहे. दरम्यान अक्षयाचा बॅचलर पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री अक्षया देवधरची बॅचलरेट पार्टी नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी तिने केलेला हटके डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याला कारणही तसेच आहे. अक्षयानं  'रा रा रेड्डी' या ट्रेडिंग गाण्यावर रिल बनवला आहे. ज्याच्यात मालिकेत साध्या-सोज्वळ रुपात दिसणाऱ्या पाठक बाईंना अचानक लुंगी नेसून डान्स करताना दिसते आहे. तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणी मुक्ता लेले आणि मानसी कानेटकर यांनीही लुंगी नेसली असून त्या डान्स करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीने त्यांच्या मित्रपरिवार-कुटुंबीयांसोबत केलेल्या केळवणाचेही फोटो समोर आले आहेत. त्यांच्या केळवणाचे फोटो समोर आले असले तरी त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशी