अंजली: डॉ असीम संकटात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 4:40 AM
महाराष्ट्रातील शहरालगत असलेलेल्या अनेक गावांमध्ये आज भयंकर परिस्थिती आहे. गाव छोटी असतात , पण नागरी प्रश्न अनेक असतात .अशी ...
महाराष्ट्रातील शहरालगत असलेलेल्या अनेक गावांमध्ये आज भयंकर परिस्थिती आहे. गाव छोटी असतात , पण नागरी प्रश्न अनेक असतात .अशी परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक गावांची आहे. पाणीपुरवठा योजना नाही, गावापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, आरोग्यसेवा त्याचे तर बारा वाजले आहेत, अशा अनेक प्रश्नांमुळे ही गावे जरी शहराशी कनेक्ट असलेली तरी विकासापासून कोसो दूर आहेत.आजही या गावांमधील आरोग्यव्यवस्था अतिशय बिकट आहे . या गावांमध्ये शहरातील डॉ जाण्यास तयार नसतात. मात्र याच मनोवृत्तीच्या विरोध असलेले अंजली मालिकेतील डॉ असीम नेहमीच अशा गावांमध्ये जाऊन सेवा करत आहेत. सध्या अंजली मालिकेतील डॉ असीम, डॉ अंजली डॉ यशस्वी आणि डॉ रोहिणी सध्या मेडिकल कॅम्प ला गावात आले आहेत . तिथे ते अतिशय मेहनतीने गावातील लोकांची सेवा करत आहेत. मेडिकल कॅम्प मुळे डॉ असीम आणि डॉ अंजली यांनाही रोजच्या दगदगीतून मोकळा वेळ मिळाल्यामुळे दोघेही खुश आहेत. मात्र त्यातच गावातील गुंड लोकांकडून अंजलीला एक पत्र येते मात्र सगळेच त्याच्याकडे दुर्लसख करतात . दुसऱ्या दिवशी मात्र गावातील एका व्यक्तीला मारून ती माणसे दुसरी चिट्ठी टाकतात. चिट्ठीमध्ये दिलेल्या धमकीनुसार त्या माणसांना डॉ असीम हवे आहेत. या प्रकरणाच्या गंभीरतेची सगळ्यांना कल्पना येते. पोलिससुद्धा त्यांना सरळ निघून जायला सांगतात.काही दिवसांपूर्वीच जागतिक अवयव दिनाचे औचित्यसाधून अंजली मालिकच्या माध्यमातून अवयव दानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अवयव दानाबद्दल बोलताना सुरुची म्हणाली होती की, "आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचे असे काय असेल? असे केल्यानंतर देखील तुमच्या पार्थिवाचे तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यसंस्कार करता येतातच , तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही हा विचार मनात येत असेल तर त्याच उत्तर निश्चीतच तुमच्या तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यविधी करता येतील असच आहे. मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरणे खूप महत्वाचे असते आपली इच्छा नोंदवून तसे आपल्या जवळच्या कुटूंबियांस सांगणे केव्हाही योग्यच.मी सुद्धा माझे ऑर्गन डोनेट करणार आहे आणि माझी विनंती आहे कि तुम्ही सुद्धा आपले ऑर्गन डोनेट करण्याबद्दल विचार करावा . अवयव दान म्हणजेच जीवनदान . "