Join us

'सहकुटुंब सहपरिवार'मधल्या अंजीचंही ठरलं!, वाढदिवसादिवशी चाहत्यांना दिली खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 18:45 IST

Komal Kumbhar : अंजीची भूमिका अभिनेत्री कोमल कुंभार हिने साकारली आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सहकुटुंब सहपरिवार(Sahkutumb Sahparivar)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील पात्रांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अंजी आणि पश्याची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. अंजीची भूमिका अभिनेत्री कोमल कुंभार (Komal Kumbhar) हिने साकारली आहे. कोमलने नुकतेच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिला आहे. 

कोमल कुंभारचा आज वाढदिवस असून तिने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कोमलसोबत तिचा भावी जोडीदारही दिसत आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे गोकुळ दशवंत. गोकुळ देखील कलाविश्वात काम करतो. तो अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. व्हिडिओत पाहायला मिळतंय की, गोकुळने गुडघ्यावर बसून कोमलला लग्नाची मागणी घातली आहे. तसेच तिच्यासाठी खास अंगठीसुद्धा त्याने बनवली होती. ती तिच्या बोटात घालत त्याने तिला लग्नासाठी विचारले आणि कोमलनेसुद्धा हसत हसत त्याला होकार दिला.

तसेच व्हिडीओत पाहायला मिळतंय की कोमल केक कापत असताना तिच्या शेजारी हॅपी बर्थडेचा बोर्ड आहे. त्यावर कोमल ऐवजी बायको असा उल्लेख केला आहे. वाढदिवसाला आपल्या जोडीदाराने दिलेले गोड सरप्राइज पाहून अभिनेत्रीसुद्धा भारावून गेली आहे. या व्हिडीओवर चाहत्यांसोबतच कलाकारमंडळीदेखील लाइक्स आणि कमेंट करत आहेत. काहीजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तर काहीजण तिचे अभिनंदन करत आहेत.