Join us

'परमावतार श्रीकृष्‍णा'मध्‍ये अंकित बाथला अर्जुनची भूमिका साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 10:47 AM

५ पांडवांची कथा सादर करत मालिका शक्तिशाली राजा अर्जुनचा प्रवास दाखवण्‍यासह भगवान कृष्‍णासोबतचे त्‍याचे आध्‍यात्मिक नाते दाखवणार आहे.

चॉकलेट बॉय असो किंवा चतुर मेव्‍हणा अंकित बाथलाने छोट्या पडद्यावर अगदी सराईतपणे भूमिका साकारल्‍या आहेत. तो मालिका 'परमावतार श्री कृष्‍णा'मध्ये अर्जुनच्‍या भूमिकेसह पौराणिक शैलीमध्‍ये पदार्पण करण्‍यासाठी सज्‍ज आहे. कृष्‍णाच्‍या जीवनावर आधारित विविध कथांना सादर करणारी मालिका 'परमावतार श्री कृष्‍ण'मध्‍ये आता २० वर्षांच्‍या लिपनंतर महाभारताची मुख्‍य कथा सादर होताना पाहायला मिळणार आहे. ५ पांडवांची कथा सादर करत मालिका शक्तिशाली राजा अर्जुनचा प्रवास दाखवण्‍यासह भगवान कृष्‍णासोबतचे त्‍याचे आध्‍यात्मिक नाते दाखवणार आहे.

नवीन शैली करण्‍याबाबत बोलताना अंकित म्‍हणाला, ''मला बालपणापासून पौराणिक कथांची आवड असून  अशा कथा पाहण्‍यापेक्षा किंवा स्‍वत:हून वाचण्‍यापेक्षा ऐकायला जास्‍त आवडायचे. अभिनेता म्‍हणून माझी पौराणिक मालिकेमध्‍ये काम करण्‍याची आणि धाडसी व शक्तिशाली व्‍यक्तिमत्‍त्‍व असलेली महत्‍त्‍वपूर्ण भूमिका साकारण्‍याची इच्‍छा होती. 

अर्जुनच्‍या भूमिकेसाठी विचारण्‍यात आले तेव्‍हा माझी इच्‍छा पूर्ण झाल्‍यासारखे मला वाटले. आजही हे नाव शौर्य, निष्‍ठा व आत्‍मविश्‍वासाचे उत्‍तम उदाहरण आहे. अर्जुनची वीरता, पराक्रम आणि श्री कृष्‍णावरील विश्‍वास आणि त्‍याचा तत्‍त्‍वज्ञानी व मार्गदर्शक म्‍हणून स्‍वीकार हा भगवद्-गीतेमधील निर्णायक टप्‍पा आहे. 

छोट्या पडद्यावर अर्जुनची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने माझे स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे वाटते. मला पडद्यावर अर्जुनची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मी आशा करतो की, प्रेक्षक देखील मालिकेमधील हा नवीन अध्‍याय पाहण्‍यासाठी उत्‍सुक असतील आणि ते माझ्या कामाची प्रशंसा करतील.''