Join us

‘दिव्य दृष्टी’मध्ये अंकित नारंग दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 7:15 AM

आता टीव्हीवरील नामवंत अभिनेता अंकित नारंग हाही या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देअंकित या मालिकेत सनी नावाच्या तरुणाची भूमिका रंगवणार आहे. मालिकेत लावण्याची भूमिका रंगविणारी अभिनेत्री मानसी श्रीवास्तव ही त्याची नायिका असणार आहे. सनी हा एका अतिश्रीमंत उद्योगपतीचा लाडावलेला मुलगा असून तो जीवनाकडे केवळ मजामस्तीच्या दृष्टिकोनातून बघत असतो

दिग्गज कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि उत्कंठावर्धक कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. भविष्यातील घटना पाहण्याची आणि त्यात बदल घडविण्याची विशेष शक्ती लाभलेल्या दिव्या आणि दृष्टी या दोन बहिणी लहानपणीच एकमेकींपासून दुरावलेल्या आहेत. त्यांचीच कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे. 

आता टीव्हीवरील नामवंत अभिनेता अंकित नारंग हाही या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अंकित या मालिकेत सनी नावाच्या तरुणाची भूमिका रंगवणार आहे. मालिकेत लावण्याची भूमिका रंगविणारी अभिनेत्री मानसी श्रीवास्तव ही त्याची नायिका असणार आहे. सनी हा एका अतिश्रीमंत उद्योगपतीचा लाडावलेला मुलगा असून तो जीवनाकडे केवळ मजामस्तीच्या दृष्टिकोनातून बघत असतो. सुरुवातीला जरी अंकितची व्यक्तिरेखा काहीशी खलप्रवृत्तीची वाटत असली, तरी अंतिमत: तोच दिव्या आणि दृष्टी यांना एकत्र आणणार आहे आपल्या या नव्या भूमिकेबद्दल अंकित नारंग सांगतो, “दिव्य दृष्टीसारख्या मालिकेत मला भूमिका रंगवता येत आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे. या मालिकेची कथा-संकल्पना अतिशय रंजक असून मला माझी भूमिका खूपच आवडली आहे. मालिकेतील काही नामवंत आणि कसलेल्या कलाकारांबरोबर काम करण्यास मी अधीर झालो आहे. मी आनंदी झालो असलो, तरी मला माझी भूमिका परिपूर्ण साकारायची असल्याने मनावर थोडं फार दडपणही आलं आहे.”

अंकितची व्यक्तिरेखा रक्षितवर (आध्विक महाजन) जरब बसविणारी असून तो सत्य उघड करताना आणि पिशाचिनीचे खरे स्वरूप उघड करताना महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

‘दिव्य दृष्टी’ ही मालिका प्रेक्षकांना शनिवार-रविवार संध्याकाळी सात वाजता स्टार प्लसवर पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :दिव्य दृष्टी