अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande) छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आता तिचा पती व बिझनेसमॅन विकी जैन (Vicky Jain) हाही टीव्ही इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री करतोय. लवकरच अंकिता व विकी स्टार प्लसवरच्या ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये झळकणार आहे. गेल्या मंगळवारी या शोचा प्रोमो आऊट झाला. खुद्द अंकितानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा प्रोमो शेअर केला आहे. अंकिताच्या फॅन्सला हा प्रोमो आवडला. पण दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे (Sushant Singh Rajput) फॅन्स मात्र हा प्रोमो पाहून भडकले. प्रोमोतील अंकिताची प्रोमोमधील वाक्य सुशांतच्या चाहत्यांच्या पचनी पडली नाहीत.
‘जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात अडचणी आल्यात, तेव्हा तेव्हा विकीची सोबत मिळाली. विकी आयुष्यात आला आणि मला खºया अर्थाने प्रेमाचा अर्थ कळू लागला. खरं सांगू तर विकी इतकं प्रेम माझ्यावर आजपर्यंत कोणी केलं नाही,’ असं अंकिता प्रोमोमध्ये म्हणते आणि सुशांतच्या चाहत्यांना नेमकी हीच गोष्ट खटकली. मग काय, या चाहत्यांनी अंकिताला ट्रोल करणं सुरू केलं.
‘सुशांतचं काय? तू खोटारडी आहेस. सोनीच्या एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सुशांतसाठीही तू सेम लाईन बोलली होतीस,’ असं एका युजरने तिला सुनावलं. ‘बोलण्याआधी जरा भूतकाळ आठवा मॅडम,’ असा सल्ला सुशांतच्या एका चाहत्याने अंकिताला दिला. ‘सॉरी, पण सुशांतने तुझ्यावर खूप प्रेम केलं. पण तू निभावू शकली नाहीस,’ अशा शब्दांत एका युजरने आपला राग व्यक्त केला. ‘सुशांतसोबत असताना त्याच्यासारखा पार्टनर नाही मिळाला, असं म्हणायची. आता विकी भेटल्यावर तू त्याच्यासोबत सुशांतच्या प्रेमाची तुलना करत आहेस,’ अशी कमेंट एका युजरने केली.
सुशांतने जून 2020 मध्ये कथितरित्या आत्महत्या केली होती. अंकिता व सुशांत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होतं. पण कालांतराने दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकीची एन्ट्री झाली होती. डिसेंबर 2021 मध्ये अंकिता व विकी यांनी लग्न केलं. या शाही लग्नाची जोरदार चर्चा झाली होती.
असा असेल स्मार्ट जोडी शोस्मार्ट जोडी या शोमध्ये अंकिता व विकीशिवाय अभिनेत्री भाग्यश्री व तिचा पती हिमालय दासानी, ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट असे कपल्स दिसणार आहेत. या कपल्सचे प्रोमोही रिलीज झाले आहेत.