Join us

'बिग बॉस'नंतर अंकिता आणि विकीच्या नात्यात दुरावा? पतीशिवायच सेलिब्रेट केला व्हॅलेंटाइन डे, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 09:19 IST

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर सगळं काही आलबेल असल्याचं अंकिताने सांगितलं होतं. पण, आता अंकिताने विकी जैनशिवायच व्हॅलेंटाइन डे साजरा केला आहे.

मराठमोळी अंकिता लोखंडे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 'बिग बॉस'मध्ये सहभागी झालेल्या अंकिताचे पती विकी जैनबरोबर छोट्या कारणांवरुन खटके उडत होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं. पण, 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर सगळं काही आलबेल असल्याचं अंकिताने सांगितलं होतं. अंकिता आणि विकी पार्टीतही एकत्र दिसले होते. पण, आता अंकिताने विकी जैनशिवायच व्हॅलेंटाइन डे साजरा केला आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती सगळ्यांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तिच्या हातात कप केकही दिसत आहेत. पण, त्या व्हिडिओत विकी मात्र कुठेच दिसत नाही. या व्हिडिओत अंकिता म्हणते, "व्हॅलेंटाइन डे स्पेशल बनवण्यासाठी रेड वेलव्हेट कपकेक...मी बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त याच गोष्टीला मिस केलं. विकी नसला तरी कपकेक खाऊन मी व्हॅलेंटाइन दिवस साजरा करेन." 

पण, अंकिताच्या या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत "कसं सांभाळत असेल विकी हिला," असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "विकीचे वेगळे प्लॅन्स होते वाटतं," अशी कमेंट केली आहे. "किती ओव्हरअॅक्टिंग करते", अशी कमेंटही केली आहे.  अंकिता आणि विकीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. विकी एक व्यावसायिक आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. 

टॅग्स :अंकिता लोखंडेव्हॅलेंटाईन्स डे