माथ्यावर मुकूट आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली ही चिमुकली कोण आहे,ओळखलंत? तिचा बालपणीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सध्या ती जाम चर्चेत आहे. तशीही ती सतत चर्चेत असते. कधी रिलेशनशिपमुळे तर कधी इन्स्टावरच्या ग्लॅमरस फोटो व व्हिडिओंमुळे. ही चिमुकली आज टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे. ब्रेकअप, डिप्रेशन आणि लग्न यामुळे ती गेल्या काही काळात बरीच चर्चेत होती. तिच्या ‘पवित्र रिश्ता’चीही जबरदस्त चर्चा झाली होती. अद्यापही तुम्ही तिला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो.
फोटोतील ही चिमुकली दुसरी कुणी नसून टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande )आहे. तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनवरुन झाली होती. दशकभरापूर्वी झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ नावाची मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अंकिता आणि सुशांतसिंग राजपूत प्रमुख भूमिकेत होते. त्यावेळी सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या जवळ आले होते.
ही मालिका संपल्यानंतर दोघे एका डान्स रियालिटी शोमध्येही सहभागी झाले होते. या शोमध्येच सुशांतने अंकिताला ऑन कॅमेरा प्रपोजही केले होते. परंतु, कालांतराने सुशांत आणि अंकितामध्ये ब्रेकअप झालं. त्यानंतर विकी जैनचा अंकिताच्या आयुष्यात प्रवेश झाला होता. नुकतंच अंकिताने विकी जैनसोबत लग्नगागठ बांधली.
अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.
सध्या विकी हा बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याची ही कंपनी कोल ट्रेडिंग, वॉशरी, लॉजेस्टिक, पॉवरप्लान्ट, रिअल इस्टेट व डायमंडचा व्यवसाय करते. रिपोर्टनुसार, बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचा फर्निचरचं शोरूमपासून डेंटल इन्स्टिट्यूटपर्यंत अनेक क्षेत्रात मोठा दबदबा आहे. शिक्षण क्षेत्रातही जैन कुटुंबानं मोठा पैसा लावला आहे. विकीचे वडील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकीएक आहेत. शिवाय एका प्री-स्कूलमध्येही त्यांची गुंतवणूक असल्याचं कळतं. नवीन पिढीतील विकी आता क्रीडा क्षेत्रातही उतरला आहे. तो बॉक्स क्रिकेट लीग संघ, मुंबई टायगर्सचा सहमालक आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून सध्या तो दूर आहे. पण येत्या काळात या इंडस्ट्रीतही त्यानं पैसा ओतला तर आश्चर्य वाटायला नको.